'परिस्थिती खूपच कठीण, आपण नंतर बोलू'; ICC चा Wimbledon ला रिप्लाय

'परिस्थिती खूपच कठीण, आपण नंतर बोलू'; ICC चा Wimbledon ला रिप्लाय

रविवारी 14 जुलैला एकाच वेळी क्रिकेट वर्ल्ड कप आणि विम्बल्डनची फायनल रंगली होती. यावेळी विम्बल्डनने आयसीसीला ट्विटरवर एक प्रश्न विचारला होता.

  • Share this:

लंडन, 16 जुलै : क्रीडाप्रेमींसाठी रविवारचा दिवस अविस्मरणीय असा ठरला. इंग्लंडमध्ये एकीकडे क्रिकेटचा जग्गजेता आणि दुसरीकडे विम्बल्डनचा विजेता ठरत होता. दोन्हीकडे अत्यंत चुरशीची आणि रोमहर्षक अशी लढत बघायला मिळाली. क्रिकेट आणि टेनिस दोन्ही आवडणाऱ्यांना तर काय बघायचं असं कोडं पडलं होतं. विम्बल्डनमध्ये रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांच्यात तुल्यबळ लढत सुरू होती. तर लॉर्ड्सवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या विजेतेपदासाठी झुंज लागली होती.

दरम्यान, आयासीसीची फिरकी घेत विम्बल्डनने ट्विटरवर एक प्रश्न विचारला. या प्रश्नाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. दोन्हीकडे सामना कोण जिंकणार यांची उत्कंठा वाढली होती. अखेरच्या क्षणापर्यंत विजेता नक्की होण्याची चिन्हे दिसत नव्हती. तेव्हा विम्बल्डनच्या अधिकृत ट्विटरवरून आयसीसीला विचारण्यात आलं की, हॅलो आयसीसी, तुमच्याकडं काय चाललंय?

रविवारी विम्बल्डनमध्ये फेडरर आणि जोकोविच यांच्यातील लढत टाय झाली. त्याचवेळी लॉर्ड्सवर सुरू असेलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यीतील सामना टाय झाला. याचवेळी विम्बल्डनने विचारलेल्या प्रश्नावर आयसीसीने दिलेलं उत्तर मजेशीर होतं. सध्या इथली परिस्थिती खूपच कठीण आहे. थोड्या वेळाने बोलू.

आयसीसी आणि विम्बल्डन यांच्यातील ही ट्विटची जोरदार चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. चाहत्यांनी याचेही काही मीम्स तयार केले आहेत.

क्रिकेट जगताला इंग्लंड हा नवा विजेता मिळाला. तर दुसरीकडे फेडररला पराभूत करून जोकोविचनं विम्बल्डन जिंकलं.

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरांतांची कोंडी होणार की विधानसभेपुरता 'बाय' मिळणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 07:55 AM IST

ताज्या बातम्या