मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ICC Ranking : आयसीसी क्रमवारीची घोषणा, तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया या क्रमांकावर

ICC Ranking : आयसीसी क्रमवारीची घोषणा, तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया या क्रमांकावर

टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडचा 3-1 ने पराभव केल्यानंतर टीम इंडिया (India vs England) आयसीसी टेस्ट क्रमवारीत (ICC Test Ranking) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 7 मार्च : टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडचा 3-1 ने पराभव केल्यानंतर टीम इंडिया (India vs England) आयसीसी टेस्ट क्रमवारीत (ICC Test Ranking) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. या टेस्ट सीरिजच्या निकालानंतर आयसीसीने नव्या क्रमवारीची घोषणा केली. या क्रमवारीत टीम इंडियाकडे 122 पॉइंट्स आहेत, तर न्यूझीलंडच्या खात्यात 118 पॉईंट्स आहेत. 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवली जाणार आहे.

वनडे क्रमवारीत भारतीय टीम 117 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आणि टी-20 क्रमवारीत 268 पॉइंट्सह तिसऱ्या क्रमांकावर आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय टीम टॉप-3 मध्ये आहे. टेस्ट क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या, पाकिस्तान पाचव्या, दक्षिण आफ्रिका सहाव्या, श्रीलंका सातव्या, वेस्ट इंडिज आठव्या आणि बांगलादेश नवव्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडची टीम श्रीलंकेमध्ये टेस्ट सीरिज 2-0ने जिंकून भारतात आली होती. त्यामुळे इंग्लंडकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करण्यात आली होती, पण त्यांनी निराशा केली. सीरिजमधल्या या पराभवानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या रेसमधून बाहेर झाल्या.

आता टी-20 सीरिज

भारत आणि इंग्लंड यांच्यात टेस्ट सीरिज संपल्यानंतर आता पाच टी-20 मॅचची सीरिज सुरू होणार आहे. या सगळ्या मॅच अहमदाबादमध्येच होणार आहेत. 12 मार्च, 14 मार्च, 16 मार्च, 18 मार्च आणि 20 मार्चला या मॅच खेळवल्या जातील. तर तीन वनडे मॅचची सीरिज पुण्यात होणार आहे. 23 मार्च, २6 मार्च आणि 28 मार्चला वनडे मॅच होतील.

First published:

Tags: Cricket, Icc, India vs england, Sports, Team india