मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पराभवानंतरही पाकिस्तानचा टी20 रॅकिंगमध्ये दबदबा कायम; Team Indiaचा पत्ता कट

पराभवानंतरही पाकिस्तानचा टी20 रॅकिंगमध्ये दबदबा कायम; Team Indiaचा पत्ता कट

babar azam

babar azam

नुकत्याच पार पडलेल्या टी20 वर्ल्डकपनंतर (T20 WorldCup) पहिल्यांदाच आयसीसीने (ICC T20 Ranking) ने टी20 रॅकिंग जाहीर केली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: नुकत्याच पार पडलेल्या टी20 वर्ल्डकपनंतर (T20 WorldCup) पहिल्यांदाच आयसीसीने (ICC T20 Ranking) ने टी20 रॅकिंग जाहीर केली आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये धावा करणाऱ्या फलंदाजांना बक्षीस मिळाले असून ते रॅकिंगमध्ये अग्रस्थानी राहिले आहेत. मात्र, या खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.

फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल तीन फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८३९ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या तर एडन मार्कराम तिसऱ्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे आता चौथ्या स्थानावर आहे, जो तीन स्थानांची झेप घेत येथे पोहोचला आहे. कॉनवेने वर्ल्डकपमध्ये आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या खेळीने न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान पाचव्या स्थानावर आहे. तो भारतीय फलंदाज केएल राहुलला मागे टाकत अव्वल 5 मध्ये पोहोचला आहे. रिझवानने विश्वचषकात 6 सामन्यात 70.25 च्या सरासरीने 281 धावा केल्या आणि तो मोठा सामना विजेता ठरला.

ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार आरोन फिंच टी-20 वर्ल्डकपमध्ये विशेष काही करू शकला नाही आणि त्यामुळे तो चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे.टॉप 10  मध्ये एकही भारतीय नसून भारताचा नंबर 1 गोलंदाज जसप्रीत बुमराह 15 व्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 586 गुण आहेत.

बुधवारी जाहीर झालेल्या टी20 रॅकिंगमध्ये भारताचा के एल राहुल फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर घसरला आहे. विराट कोहली पूर्वीप्रमाणेच आठव्या स्थानावर कायम आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताच्या शेवटच्या तीन सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या राहुलचे 727 गुण आहेत आणि तो एका स्थानाने खाली घसरला आहे. भारतीय T20 संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त झालेल्या राहुलने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध अनुक्रमे 69, 50 आणि नाबाद 54 धावा केल्या. भारत या स्पर्धेच्या सुपर-12 टप्प्यातूनच बाद झाला. भारतीय टी-20 संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मालाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहित 15 व्या स्थानावरून 16 व्या स्थानावर घसरला आहे.

इतर खेळाडूंमध्ये, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनीही त्यांच्या संघाच्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर क्रमवारीत लक्षणीय सुधारणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात नाबाद ७७ धावांची खेळी करणारा मार्श सहा स्थानांनी पुढे सरसावला असून तो संयुक्त13 व्या स्थानावर आहे, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडलेला वॉर्नर आठ स्थानांनी प्रगती करत 33 व्या स्थानावर आहे.

अंतिम सामन्यात 85 धावा करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन सात स्थानांनी 32 व्या स्थानावर आहे.  गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झाम्पा दोन स्थानांनी प्रगती करत तिसऱ्या स्थानावर तर वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने दोन स्थानांनी प्रगती करत सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सात स्थानांची झेप घेत 14व्या स्थानावर पोहोचले आहे.

First published:

Tags: Babar azam, Icc, T20 cricket, T20 world cup