क्रिकेटमध्ये झाला मोठा भ्रष्टाचार, ICCने कर्णधारासह तीन खेळाडूंना केले निलंबित

जेंटलमन गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटलाही भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 02:06 PM IST

क्रिकेटमध्ये झाला मोठा भ्रष्टाचार, ICCने कर्णधारासह तीन खेळाडूंना केले निलंबित

दुबई, 17 ऑक्टोबर : याआधी राजकारणात, अर्थव्यवस्थेत भ्रष्टाचार आणि घोटाळा झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. मात्र आता जेंटलमन गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटलाही भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. याआधी मॅच फिक्सिंग प्रकरणी आयसीसीनं खेळाडूंवर बंदीची कारवाई केली होती. आता मात्र भ्रष्टाचाराचे 13 नियम मोडल्याप्रकरणी आयसीसीनं कर्णधारासह तीन खेळाडूंवर कारवाई केली आहे.

संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाच्या (United Arab Emirates Cricket Team) तीन खेळाडूंवर आयसीसीनं कारवाई केली आहे. या खेळाडूंना निलंबीत करण्यात आले आहे. संघाचा कर्णधार मोहम्मद नावीद (Mohammad Naveed),

फलंदाज शैमान अन्वर (Shaiman Anwar) आणि गोलंदाज कादर अहमद (Qader Ahmed) यांच्यावर 13 नियम मोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय महरदीप छायाकारवरही भ्रष्टाचाराचे नियम मोडल्याचा आरोप आहे.

वाचा-एका अपूर्ण शतकासाठी सेहवागला आजही मागावी लागते कुंबळेची माफी

या आठवड्यात टी-20 वर्ल्ड कपसाठीची पात्रता स्पर्धा सुरू होणा आहे. यासाठी युएई संघ जाहीर करण्यात आला आहे. यात 31 वर्षीय अहमद रझाला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. या संघात नावीदचा समावेश करण्यात आलेला नाही. आयसीसीनं बुधवारी जारी केलेल्या पत्रात, नावीद आणि अनवर यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप सिध्द झाले आहेत. त्यामुळं पात्रता स्पर्धेसाठी त्यांना संघात सामिल करण्यात आलेले नाही. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Loading...

वाचा-हरभजननं हेरला आफ्रिकेचा डाव, ‘हा’ क्रिकेटपटू तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार?

नावीद आणि अन्वरकडून होत्या खुप अपेक्षा

नावीद आणि अन्वर संघाचे प्रमुख खेळाडू होते. युएईमध्ये होणाऱ्या क्वालिफायर सामन्यांसाठी त्यांची संघाला गरज होती. वर्ल्ड टी-20च्या क्वालिफायरमध्ये 14 संघ सामिल होणार आहेत. यातील टॉप 6 संघ पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहे. नावीदनं 39 एकदिवसीय सामन्यात 397 धावा केल्या आहेत तर 53 विकेट घेतल्या आहेत. तर, 31 टी-20 सामन्यात 176 धावा करत 37 विकेट घेतल्या आहेत. तर, शैमान अन्वरनं 40 एकदिवसीय सामन्यात 1219 धावा केल्या आहेत. तर, 31 टी-20 सामन्यांमध्ये 971 धावा केल्या आहेत.

वाचा-विराटची चिंता वाढली! गांगुलीनं काढले कोहली विरोधात फर्मान

भाजपचं ठरलंय! 'हे' असणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ICC
First Published: Oct 17, 2019 02:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...