आयसीसी क्रमवारीत मराठमोळ्या केदार जाधवची मोठी भरारी

आयसीसी क्रमवारीत मराठमोळ्या केदार जाधवची मोठी भरारी

ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या पराभवानंतरही विराट कोहली, बुमराहचे आयसीसी क्रमवारीतले अव्वल स्थान कायम.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च- नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दारुण पराभव स्वीकारल्यानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन डे क्रमवारीत कोणतेही विशेष बदल झालेले नाहीत. उलट महाराष्ट्राच्या केदार जाधवने आपल्या कारकिर्दीतले सर्वोच्च स्थान गाठत, 11 स्थानांच्या सुधारणेसह 24 वे स्थान पटकावले आहे. तर, भारताचा कर्णधार विराट कोहली आणि जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी मात्र आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांना चढउतारांचा सामना करावा लागला होता. तरीही या दोघांनी वन डे फलंदाजीमध्ये आपले अनुक्रमे पहिले व दुसरे टिकवले आहे. तर भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन 12व्या स्थानी कायम आहे. मात्र, गोलंदाजीमध्ये भारताचा एकही गोलंदाज अव्वल पाचमध्ये नाही. अफगाणिस्तानचा रशीद खान अष्टपैलू खेळाडूंत अव्वल क्रमांकावर कायम आहे. तर, कुलदीप यादव 6 व्या आणि युजवेंद्र चहल 8 व्या स्थानी कायम आहेत.

संघांमध्ये इंग्लंड आणि भारत हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. न्यूझीलंडनं तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे, तर दक्षिण आफ्रिकेची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर, ऑस्ट्रेलियाची पाचव्या स्थानी बढती झाली आहे. मात्र, इंग्लंडमध्ये होत असलेल्या वर्ल्डकपमध्ये ही क्रमवारी काही अंशी बदलण्याची शक्यता असली तरी, विराट, कोहली, बुमराह यांचे अव्वल स्थान भारातासाठी जमेची बाजू ठरु शकते.

‘उरी’ सिनेमात पर्रिकरांची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

First published: March 18, 2019, 6:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading