Eng vs Pak : आयसीसी म्हणतं बॉल टेम्परिंग झालचं नाही पण...

Eng vs Pak : आयसीसी म्हणतं बॉल टेम्परिंग झालचं नाही पण...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळं खळबळ माजली होती पण आयसीसीनं याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

  • Share this:

लंडन, 12 मे : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात बॉल टेम्परिंगचा प्रकार घडला असल्याची शक्यता चाहत्यांनी वर्तवली होती. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यात इंग्लंडचा गोलंदाजानं चेंडू कुरकतडण्याचा प्रकार करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत होते. मात्र, या प्रकरणाबाबत आयसीसीनं एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांनी बॉल टेम्परिंग केल्यामुळं क्रिकेटच्या दुनियेत खळबळ माजली होती. दरम्यान त्यांनी बंदीची कारवाई पूर्ण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र आता पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रकार घडल्याची शंका चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात जॉस बटलरनं 55 चेंडूंत 9 षटकार व 6 चौकार खेचून नाबाद 110 धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडन पाकिस्तानसमोर 374 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना, पाकिस्तानकडूनही त्यांना कडवे उत्तर मिळाले, परंतु त्यांना अवघ्या 12 धावांनी हा सामना गमवावा लागला. पण, या सामन्यात 'बॉल टॅम्परिंग' झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजावर बंदीची कारवाई होणार की नाही, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले असताना, आयसीसीनं आपल्या ट्विटरवरुन याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.  होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत वृत्त आयसीसीनं जारी केलेले नाही.

आयसीसीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास केला. पण, त्यांनी प्लंकेटला क्लिन चीट दिली. 'सामनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॉल टॅम्परिंगसारखा कोणताही प्रकार घडलेला नाही. तसे पुरावेही नाहीत,' अशी प्रतिक्रीया आयसीसीनं दिली आहे. त्यामुळं या प्रकरणावर पडदा पडला असला तरी, चाहत्यांनी मात्र या गोलंदाजावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. चाहत्यांनी मात्र आयसीसी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

तर, पाकिस्तानच्या चाहत्यांनी हाच प्रकार पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी केला असता तर त्यावर कारवाई झाली असती. मग आता इंग्लंडच्या खेळाडूवर काम का नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान आयसीसीनं या प्रकरणाला क्लिन चीट दिली असली तरी, इंग्लंडचा संघ यावर काय प्रतिक्रिया देतो हा पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: May 13, 2019, 2:59 PM IST

ताज्या बातम्या