ICC ODI Ranking : वनडे क्रिकेटला मिळाली नवी नंबर 1 टीम, भारत या क्रमांकावर

ICC ODI Ranking : वनडे क्रिकेटला मिळाली नवी नंबर 1 टीम, भारत या क्रमांकावर

आयसीसीने क्रमवारीमध्ये (ICC Rankings) वार्षिक अपडेट केल्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये (ODI) नवी टीम पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. मागच्या वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी करणारी न्यूझीलंडची (New Zealand) टीम आयसीसीच्या वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

  • Share this:

दुबई, 3 मे : आयसीसीने क्रमवारीमध्ये (ICC Rankings) वार्षिक अपडेट केल्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये (ODI) नवी टीम पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. मागच्या वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी करणारी न्यूझीलंडची (New Zealand) टीम आयसीसीच्या वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. आयसीसी प्रत्येक वर्षी मे महिन्यात रेटिंगचा कालावधी बदलते, त्यामुळे क्रमवारी ठरवताना मागच्या तीन वर्षांमधले निकालच ग्राह्य धरले जातात. या नियमानुसार 1 मे 2018 च्या आधीच्या सामन्यांचे गूण रद्द केले जातात. डेव्हिड केन्डिक्स यांनी तयार केलेल्या फॉर्म्युलानुसार ही क्रमवारी ठरवली जाते.

या फॉर्म्युलानुसार 2018/19 आणि 2019/20 या मोसमाला 50 टक्के आणि मे 2020 पासूनच्या मोसमाला 100 टक्के धरलं जातं. या फॉर्म्युलानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेली न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर पोहोचली, तर इंग्लंडची (England) टीम चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. टीम इंडियाची (Team India) तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारतीय टीम इंग्लंडपेक्षा फक्त काही अंशांनी पुढे आहे.

यंदाच्या मोसमात इंग्लंडचा भारत, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पराभव झाला. तसंच 2017/18 साली इंग्लंडने जिंकलेल्या लागोपाठ 5 वनडे सीरिज रेटिंग्जमधून काढून टाकण्यात आल्या, त्यामुळे त्यांची घसरण झाली.

न्यूझीलंडच्या टीमने मागच्या 30 वनडेमध्ये 20 मॅच जिंकल्या आहेत. त्यांनी श्रीलंका, भारत आणि बांगलादेशचा पराभव केला, तसंच 2019 वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही किवी टीम पोहोचली होती. या क्रमवारीत वेस्ट इंडिजची टीम आठव्या आणि श्रीलंका नवव्या क्रमांकावर आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये इंग्लंडची टीम पहिल्या क्रमांकावर कायम आहे, तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर, न्यूझीलंड तिसऱ्या, पाकिस्तान चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे. टेस्ट क्रमवारीमध्ये पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्या सीरिजनंतर बदल केला जाईल, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.

Published by: Shreyas
First published: May 3, 2021, 11:31 PM IST
Tags: cricketicc

ताज्या बातम्या