ICC ODI Ranking : फक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा

ICC ODI Ranking : फक्त कर्णधारपदासाठी नाही तर अव्वल स्थानासाठीही विराट-रोहितमध्ये स्पर्धा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे स्थान अबाधित तर रोहित शर्माला एका स्थानाचा फायदा.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारताचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपुष्टात आला. त्यानंतर विराट कोहलीच्या कर्णधार पदावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र विराटच्या वैयक्तिक खेळीवर भारताच्या पराभवाचा तोटा झालेला नाही. नुकत्याच आयसीसीनं जारी केलेल्या रॅंकिंगमध्ये विराट कोहलीचे पहिल्या नंबरचे स्थान कायम आहे. तर, वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त धावा करणारा रोहित शर्मा सध्या दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. त्यामुळं वेस्ट इंडिजविरोधात चांगली कामगिरी करत रोहित विराटचे स्थान घेऊ शकतो.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची यादी आयसीसीनं नुकतीच जारी केली. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर तर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, गोलंदाजीमध्ये पहिल्या दहामध्ये भारताचा एकमेव गोलंदाज आहे, तो म्हणजे जसप्रीत बुमराह. दरम्यान वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात चौकारांमुळं पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सननं सर्वश्रेष्ठ रॅकिंगवर आहे.

वाचा- कर्णधारपद धोक्यात? विराटने घेतला हा मोठा निर्णय!

वाचा- विराटची 'कसोटी', रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व?

रवींद्र जडेजानं घेतली मोठी उडी

सेमीफायनलमध्ये 77 धावांची खेळी करत भारताचा विजयाच्या आशा दाखवणारा रवींद्र जडेजा 796 गुणांसह सहाव्या क्रमाकांवर पोहचला आहे. फलंदाजांच्या रॅकिंगमध्ये जडेजानं 24 स्थानांची प्रगती केली आहे.

पहिल्यांदाच विल्यम्सनची सर्वश्रेष्ठ कामगिरी

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सनला वर्ल्ड कपची ट्रॉफी मिळाली नसली तरी मालिकावीराच्या पुरस्कारासोबतच पहिल्यांदाच 799 आकड्यांचा टप्पा त्यानं गाठला . भारताविरोधात सेमीफायनलमध्ये केनंन महत्त्वपूर्ण अशी 67 धावांची खेळी केली. सध्या केन एकदिवसीय क्रिकेटच्या रॅंकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

वाचा- 'ICC अजुनही न्यूझीलंडला विजेतेपद देऊ शकते'

इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO

First published: July 16, 2019, 1:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading