आयसीसी पुन्हा क्रिकेट चाहत्यांच्या टार्गेटवर, मलिंगाच्या निवृत्तीवर दिली चुकीची माहिती!

बांगलादेशविरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने 91 धावांनी मात देत मलिंगाला विजयी निरोप दिला.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 03:12 PM IST

आयसीसी पुन्हा क्रिकेट चाहत्यांच्या टार्गेटवर, मलिंगाच्या निवृत्तीवर दिली चुकीची माहिती!

कोलंबो, 27 जुलै : श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज, यॉर्कर किंग लसिथ मलिंगानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. बांगलादेशविरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत मलिंगाला निरोप दिला. पहिल्याच सामन्यात बांगलादेशवर श्रीलंकेने 91 धावांनी मात दिली. यात मलिंगानं शेवटच्या षटकात घेतलेल्या विकेट महत्त्वाचा ठरल्या.

35 वर्षीय मलिंगानं आपल्या करिअरमध्ये 814 विकेट घेतल्या आहेत. तर, बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यात मलिंगानं 3 विकेट घेत सर्वात जास्त विकेट घेण्याच्या यादीत भारतीय माजी खेळाडू अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. बांगलादेश विरोधात मलिंगानं केवळ 38 धावा देत तीन विकेट घेतल्या.

मलिंगाला महान फलंदाज सचिन तेंडुलकरपासून आयसीसीनंही शुभेच्छा दिल्या. मात्र आयसीसीनं मलिंगाबाबत चुकीची माहिती दिली, त्यानंतर चाहत्यांनी आयसीसीला ट्रोल करण्यास सुरुवात केले. दरम्यान लगेचच आयसीसीनं हे ट्वीट डिलीट केले.

वाचा-'तुच खरा मॅच विनर', मलिंगाच्या निवृत्तीवर भावुक झाला रोहित!

Loading...

श्रीलंकेसाठी मलिंगाने 225 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात मलिंगानं 338 विकेट घेतल्या आहेत. मात्र आयसीसीनं आपल्या पोस्टमध्ये मलिंगाने 335 विकेट घेतल्या, अशी माहिती दिली. या चूकीवर आयसीसीला ट्रोल करण्यात आले आहे. याआधी आयसीसीनं दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या जागी रंगना हेरथचा फोटो वापरला होता.

वाचा-यॉर्कर किंग मलिंगाचे 'हे' पाच रेकॉर्ड्स मोडणे दिग्गजांनाही नाही जमले!

मलिंगानं शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 38 धावा देत तीन विकेट घेतल्या. याचबरोबर मलिंगा सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता नवव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

वाचा-...म्हणून फलंदाजांची झोप उडवणारा मलिंगा 10 वर्षात घरी गेलाच नाही

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप सुटका, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 03:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...