Home /News /sport /

ICC Test Team Of The Year ची घोषणा, तीन भारतीयांचा समावेश, विराटला स्थान नाही!

ICC Test Team Of The Year ची घोषणा, तीन भारतीयांचा समावेश, विराटला स्थान नाही!

आयसीसीने गुरूवारी पुरुष टेस्ट टीम ऑफ द इयरची (ICC Men’s Test Team of the Year) घोषणा केली आहे. 2021 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या या टीममध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, पण विराट कोहलीला (Virat Kohli) या टीममध्ये स्थान नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 जानेवारी : आयसीसीने गुरूवारी पुरुष टेस्ट टीम ऑफ द इयरची (ICC Men’s Test Team of the Year) घोषणा केली आहे. 2021 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या या टीममध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, पण विराट कोहलीला (Virat Kohli) या टीममध्ये स्थान नाही. या टीममध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि आर.अश्विन यांचा समावेश आहे. याआधी आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 आणि वनडे टीममध्ये एकाही भारतीय पुरुष खेळाडूचा समावेश नव्हता. आयसीसीच्या टी-20 आणि वनडे टीमचा कर्णधार असलेला बाबर आझम (Babar Azam) याला टेस्ट टीममध्ये मात्र स्थान मिळालेलं नाही. ICC ODI Team of The Year : टीम इंडियाची पुन्हा निराशा, शेजारच्या देशांचा दबदबा न्यूझीलंडच्या केन विलियमसनला (Kane Williamson) या टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. विलियमसनच्या नेतृत्वामध्येच न्यूझीलंडने जून महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. याशिवाय त्याने 2021 मध्ये 4 मॅच खेळून 65.83 च्या सरासरीने एक शतकासह 395 रन केले. रोहित शर्माची (Rohit Sharma) आयसीसी टेस्ट टीममध्ये ओपनर म्हणून निवड झाली आहे. 2021 मध्ये रोहितने दोन शतकांसह 47.68 च्या सरासरीने 906 रन केले. यातली दोन्ही शतकं इंग्लंडविरुद्ध प्रतिकूल परिस्थितीमधली आहेत. रोहितने एक शतक चेन्नईमध्ये तर दुसरं ओव्हलमध्ये केलं. सांगलीच्या स्मृतीने वाचवली टीम इंडियाची लाज, ICC T20 Team मध्ये एकमेव भारतीय आयसीसी टेस्ट टीम दिमुथ करुणारत्ने, रोहित शर्मा, मार्नस लाबुशेन, जो रूट, केन विलियमसन (कर्णधार), फवाद आलम, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, काईल जेमिसन, हसन अली, शाहिन आफ्रिदी
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Icc, Team india

    पुढील बातम्या