• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup; तेव्हाच Hardik Pandya ला प्लेइंग XI मध्ये स्थान द्या; गौतमचे 'गंभीर' विधान

T20 World Cup; तेव्हाच Hardik Pandya ला प्लेइंग XI मध्ये स्थान द्या; गौतमचे 'गंभीर' विधान

Hardik Pandya

Hardik Pandya

माजी क्रिकेटर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पांड्याच्या फिटनेसवर शंका उपस्थित करत प्लेइंग XI संघातील त्याच्या स्थानसंदर्भात मोठे विधान केले आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑक्टोबर: टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खेळीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. नुकतच पार पडलेली आयपीएल (IPL2021) स्पर्धा आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात पांड्या गोलंदाजी करताना दिसला नाही. परंतु, तो लवकरच गोलंदाजी करेल अशी आशा व्यक्त केली जात असली तरी, माजी क्रिकेटर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पांड्याच्या फिटनेसवर शंका उपस्थित करत प्लेइंग XI संघातील त्याच्या स्थानसंदर्भात मोठे विधान केले आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियासोबत संवाद साधताना गंभीरने पांड्याच्या फिटनेसवर भाष्य करत त्याची प्लेइंग XI साठी निवड व्हावी की नको यावर आपले मत मांडले. ''पांड्याने नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये गोलंदाजी न केल्यामुळे, निवडकर्त्यांनी फिरकी गोलंदाजी अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा समावेश केला. पांड्याने त्याचा पू र्ण कोटा गोलंदाजी करावी अशी माझी इच्छा आहे. जर तंदुरुस्तीची समस्या नसेल, तर तो संघाला चांगला समतोल देऊ शकतो. पण जर त्याने गोलंदाजी केली नाही तर मी त्याला माझ्या संघात ठेवणार नाही.'' असे स्पष्ट मत गंभीरने यावेळी व्यक्त केले. तसेच, पांड्या जेव्हा गोलंदाजी करेल तेव्हाच त्याला प्लेइंग XI मध्ये स्थान द्यावे असा सल्लाही त्याने यावेळी दिला आहे. 2007 च्या टी -20 वर्ल्डचा उल्लेख करताना गंभीर म्हणाला की दोन्ही संघांमध्ये समानता आहे. त्या वेळीही कर्णधारासह अनेक खेळाडू त्यांची जागा पक्की केली आहे. विराटने विश्वचषकानंतर टी -20 कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. केएल राहुल सुरुवातीच्या आघाडीवर स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांना हार्दिकला एक यशस्वी अष्टपैलू म्हणून बघायचे आहे. पण आतापर्यंत तसे झाले नाही. सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि वरुण चक्रवर्ती अजूनही त्यांच्या सुरुवातीच्या अवस्थेत आहेत. धोनी पहिल्यांदा मेंटॉर म्हणून संघाशी जोडला गेला आहे. वर्ष 2007 प्रमाणेच हे वर्ष आहे. असे मतही त्याने यावेळी व्यक्त केले.
  Published by:Dhanshri Otari
  First published: