• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • INDvsPAK लढतीत कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार, मग ओपनरची संधी कुणाला?

INDvsPAK लढतीत कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार, मग ओपनरची संधी कुणाला?

INDvsPAK लढतीत कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार

INDvsPAK लढतीत कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार

दुबईच्या मैदानावर 24 ऑक्टोबरला भारताची लढत पाकिस्तान (NDvsPAK) संघाशी होणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने होणाऱ्या या महामुकाबला सामन्यात ओपनर म्हणून कोणाला संधी दिली जाणार आहे याचा खुलासा केला आहे.

 • Share this:
  दुबई, 18 ऑक्टोबर : युएई येथे सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड  कपमध्ये (ICC T20 World Cup) रविवार, 24 ऑक्टोबरला भारताची लढत पाकिस्तान (NDvsPAK) संघाशी होणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने होणाऱ्या या  महामुकाबला सामन्यात ओपनर म्हणून कोणाला संधी दिली जाणार आहे याचा खुलासा (I will bat at No.3, KL Rahul will open with Rohit Sharma and that's the only thing I can say Virat Kohli)केला आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे ओपनर कोण असणार याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली असताना विराटने याचे उत्तर देत चर्चेला पुर्णविराम दिला आहे. अनुभवी रोहित शर्माच्या साथीने ‘आयपीएल’मध्ये छाप पाडणाऱ्या के. एल. राहुललाच सलामीसाठी प्राधान्य दिले जाईल, असे कोहलीने स्पष्ट केले. तसेच, तो स्वत: तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याची माहितीदेखीली त्याने यावेळी दिली. सोमवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या सराव सामन्यातील टॉसदरम्यान कोहलीने किमान भारताच्या आघाडीच्या फळीचे समीकरण स्पष्ट केले. ‘‘आयपीएलपूर्वी मी नक्कीच सलामीला उतरण्याचा विचार करत होतो, परंतु राहुलच्या ‘आयपीएल’मधील कामगिरीकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. रोहित साहजिकच तुमचा पहिला पसंतीचा सलामीवीर असून त्याच्या साथीने राहुलला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेन,’’ असे कोहली म्हणाला. दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. या सामन्यासह, दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी या स्पर्धेतीत त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील.  टी20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या मंचावर, भारताचा संघ आजपर्यंत पाकिस्तानकडून कधीही हरला नाही आणि त्यांचा तोच विक्रम कायम राखण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. टी – 20 कर्णधार म्हणून टीम इंडियासाठी विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा असेल. म्हणूनच, त्याने आणि टीम इंडियाने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारण्यासाठी तयारी सुरु केली आहे. आयपीएलमध्ये राहुलने 628 धावा केल्या तर 30 षटकार ठोकले. तो या स्पर्धेचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. राहुलने सराव सामन्यात अर्धशतकही केले आणि 51 धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्याशिवाय दुसरा सलामीवीर इशान किशनने 70 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: