मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ICC T20 Team of The Year : बाबर आझम कॅप्टन, पाहा टीममध्ये किती भारतीय?

ICC T20 Team of The Year : बाबर आझम कॅप्टन, पाहा टीममध्ये किती भारतीय?

आयसीसीने बुधवारी 2021 च्या आयसीसी टी-20 टीम ऑफ द इयरची (ICC Men’s T20I Team of the Year) घोषणा केली आहे. आयसीसीच्या या टीमचं कर्णधारपद पाकिस्तानच्या बाबर आझमला (Babar Azam) देण्यात आलं आहे.

आयसीसीने बुधवारी 2021 च्या आयसीसी टी-20 टीम ऑफ द इयरची (ICC Men’s T20I Team of the Year) घोषणा केली आहे. आयसीसीच्या या टीमचं कर्णधारपद पाकिस्तानच्या बाबर आझमला (Babar Azam) देण्यात आलं आहे.

आयसीसीने बुधवारी 2021 च्या आयसीसी टी-20 टीम ऑफ द इयरची (ICC Men’s T20I Team of the Year) घोषणा केली आहे. आयसीसीच्या या टीमचं कर्णधारपद पाकिस्तानच्या बाबर आझमला (Babar Azam) देण्यात आलं आहे.

मुंबई, 19 जानेवारी : आयसीसीने बुधवारी 2021 च्या आयसीसी टी-20 टीम ऑफ द इयरची (ICC Men’s T20I Team of the Year) घोषणा केली आहे. आयसीसीच्या या टीमचं कर्णधारपद पाकिस्तानच्या बाबर आझमला (Babar Azam) देण्यात आलं आहे. बाबरशिवाय मोहम्मद रिझवान आणि शाहिन आफ्रिदी हे पाकिस्तानी खेळाडूही आयसीसीच्या टीममध्ये आहेत. आयसीसीच्या या टीममध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. आशियातून श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा आणि बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमान हे दोन आणखी खेळाडू या टीममध्ये आहेत.

भारतासाठी 2021 वर्ष निराशाजनक होतं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-12 स्टेजलाच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. 'पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 2021 मध्ये टी-20 फॉरमॅटचा उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू होता. टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेतला तो सर्वाधिक रन करणारा खेळाडूही ठरला. 2021 साली बाबरने 29 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या, यात त्याने 37.56 च्या सरासरीने 939 रन केले, यात एक शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश होता. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली,' त्यामुळे बाबरला आयसीसी टीमचं नेतृत्व देण्यात आलं, असं आयसीसीने सांगितलं.

जॉस बटलरने 65 च्या सरासरीने केल्या रन

इंग्लंडचा विकेट कीपर जॉस बटलरही (Jos Buttler) क्रिकेटच्या सगळ्यात छोट्या फॉरमॅटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने 14 मॅचमध्ये 65.44 च्या सरासरीने 589 रन केले, यात एका शतकाचा समावेश होता. टी-20 वर्ल्ड कपमध्ये बटलरने 269 रन केले. याच स्पर्धेत त्याने श्रीलंकेविरुद्ध अविस्मरणीय शतकही झळकावलं.

मोहम्मद रिझवानने केलं राज्य

पाकिस्तानचा विकेट कीपर बॅटर मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) यावर्षी टी-20 क्रिकेटवर राज्य केलं. फक्त 29 मॅचमध्येच त्याने 73.66 च्या सरासरीने 1326 रन केले. त्याचा स्ट्राईक रेटही 134.89 चा होता. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचवण्यात मोहम्मद रिझवानची भूमिका महत्त्वाची ठरली.

वानिंदू हसरंगाचा उदय

श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदु हसरंगासाठी (Wanindu Hasaranga) 2021 हे वर्ष यशस्वी ठरलं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये 16 विकेट घेत हसरंगा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. हसरंगाने एकूण 20 मॅचमद्ये 11.63 च्या सरासरीने 36 विकेट घेतल्या. तसंच त्याने 196 रन केल्या.

आयसीसी टी-20 टीम

जॉस बटलर, मोहम्मद रिझवान (विकेट कीपर), बाबर आझम, एडन मार्करम, मिचेल मार्श, डेव्हिड मिलर, तबरेज शम्सी, जॉस हेजलवूड, वानिंदू हसरंगा, मुस्तफिजूर रहमान, शाहीन आफ्रिदी

First published:

Tags: Babar azam, Icc, T20 cricket