भारत-पाकच्या खेळाडूंची ऐतिहासिक भागिदारी, संघाला मिळवून दिला विजय

आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 मधील पहिल्या सामन्यात ओमानने विजय मिळवला.

News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2019 02:10 PM IST

भारत-पाकच्या खेळाडूंची ऐतिहासिक भागिदारी, संघाला मिळवून दिला विजय

एबर्डीन, 15 ऑगस्ट : स्कॉटलंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 मधील पहिला सामना ओमानने जिंकला. हा सामना फक्त ओमानसाठीच नाही तर भारत आणि पाकिस्तानसाठी सुद्धा महत्त्वाचा ठरला. दोन्ही देश एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत पण ओमानच्या विजयाचं श्रेय भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना जातं. भारताच्या संदीप गौड आणि पाकिस्तानच्या फैयाज बट्ट यांनी ओमानकडून खेळताना 7 व्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी केली. यामुळे ओमानने 4 गडी राखून पापुआ न्यू गिनीवर विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून ओमानचा कर्णधार जीशानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पापुआ न्यू गिनीने 50 षटकांत 8 बाद 229 धावा केल्या. 230 धावांचे आव्हान घेऊनव मैदानात उतरलेल्या ओमानची अवस्था 5 बाद 108 झाली होती. तेव्हा सूरज कुमार आणि संदीप गैड यांनी 36 धावांची भागिदारी केली. सूरज कुमार बाद झाल्यानंतर फैयाज बट्टसोबत संदीप गौडने 90 धावांची अभेद भागिदारी करून संघाला विजय मिळवून दिला. संदीप गौडनं नाबाद 67 तर फैयाज बटने नाबाद 32 धावांची खेळी केली.

संदीप गौड हैदराबादचा असून त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिलं अर्धशतकही साजरं केलं. फैयाज बट्ट हा अष्टपैलू खेळाडू असून पाकिस्तानातील सियालकोटचा आहे. फैयाज पाकिस्तानकडून अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे.

Loading...

दौंड : कुरकुंभ MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 15, 2019 02:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...