मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

यूएईत रंगणार T20 World Cup चा थरार; एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक

यूएईत रंगणार T20 World Cup चा थरार; एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक

यूएईत रंगणार T20 World Cup 2021 थरार; एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

यूएईत रंगणार T20 World Cup 2021 थरार; एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

आयपीएलनंतर (IPL2021)आता सर्व क्रिकेट वेड्यांना टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेचे वेध लागले आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज १७ ऑगस्ट रोजी पुरुषांच्या टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक.

पुढे वाचा ...
  दुबई, 17 ऑक्टोबर : आयपीएलनंतर (IPL2021)आता सर्व क्रिकेट वेड्यांना टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेचे वेध लागले आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज १७ ऑगस्ट रोजी पुरुषांच्या टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक. टी-२० वर्ल्डकप कोरोनाच्या संकटामुळे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत युएई आणि ओमन या देशांमध्ये खेळवला जात आहे. ठिकाण बदललं असलं तरी स्पर्धेची उत्सुकता मात्र तिळभरही कमी झालेली नाही. विश्वचषकाचे संपूर्ण सामने हे युएई आणि ओमन देशात घेण्यात येणार असल्याचे माहिती याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) दिली होती. त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी पहिला सामना पार पडणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या भव्य स्पर्धेचे सामने केवळ चार मैदानात खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये दुबई इंटरनेशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबूधाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी ग्राउंड या मैदानांचा समावेश आहे. या पात्रता फेरीत दोन ग्रुप आहेत. ग्रुप ए मध्ये आयर्लंड, नेदरलँड, श्रीलंका आणि नामिबिया तर ग्रुप बी मध्ये ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि बांगलादेश हे संघ आहे. दोन्ही ग्रुपमध्ये प्रत्येकी दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील. ग्रुप ए मधील लढती- ग्रुप ए मधील पहिली लढत अबुधाबी मैदानावर २३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होईल. तर अखेरची लढत ६ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीने होईल. ग्रुप बी मधील लढती- ग्रुप बी मधील पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या लढतीने होईल. ही लढत दुबईत होणार आहे. या ग्रुपमधील अखेरची लढत देखील भारताच्या सामन्याने होणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी भारत पात्रता फेरीतील दुसऱ्या क्रमांकाच्या संघासोबत लढेल.

  विजेत्यांची होणार चांदी

  या भव्य स्पर्धेत विजयी रक्कमही तितकीच भव्य आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाला 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच 12.2 कोटी रुपये मिळतील. तर उपविजेत्या संघाला 8 लाख डॉलर म्हणजेच 6.1 कोटी आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 4 लाख डॉलर म्हणजे 3 कोटी भारतीय रुपये मिळणार आहेत. या स्पर्धेत एकूण 5.6 मिलियन डॉलर (भारतीय चलणानुसार 42 कोटी) इतकी बक्षीसी रक्कम सहभागी संघांमध्ये वाटप केली जाणार आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: T20 cricket, T20 world cup

  पुढील बातम्या