मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराट कोहलीच्या संतापानंतर ICC बदलणार तो वादग्रस्त नियम

विराट कोहलीच्या संतापानंतर ICC बदलणार तो वादग्रस्त नियम

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या सीरिजमध्ये आयसीसीच्या (ICC) दोन नियमांवरून बराच वाद झाला. डीआरएसशी जोडला गेलेला अंपायर्स कॉल (DRS Umpires Call) आणि सॉफ्ट सिग्नलवरून (Soft Signal) विराट कोहलीने (Virat Kohli) उघडपणे संताप व्यक्त करत या नियमांवर टीका केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 26 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या सीरिजमध्ये आयसीसीच्या (ICC) दोन नियमांवरून बराच वाद झाला. डीआरएसशी जोडला गेलेला अंपायर्स कॉल (DRS Umpires Call) आणि सॉफ्ट सिग्नलवरून (Soft Signal) विराट कोहलीने (Virat Kohli) उघडपणे संताप व्यक्त करत या नियमांवर टीका केली. यानंतर आता आयसीसी यातला एक नियम बदलण्याच्या तयारीत आहे. क्रिकबजमध्ये आलेल्या वृत्तानुसार आयसीसी सॉफ्ट सिग्नलचा नियम रद्द करू शकते. गुरुवारी आयसीसी बोर्डाची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सॉफ्ट सिग्नलचा मुद्दा उचलला. या मुद्द्यावर त्यांना दुसऱ्या बोर्डांकडूनही समर्थन मिळालं. अंपायरच्या सॉफ्ट सिग्नलचा नियम बदलण्यात यावा, या मताचे सगळे सदस्य होते.

क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेरलिबोर्न क्रिकेट क्लबनेही (MCC) अंपायर सॉफ्ट सिग्नलवर आपलं मत मांडलं होतं. मैदानातल्या काही कॅचबाबत अंपायरचा सॉफ्ट सिग्नल रद्द केला गेला पाहिजे, अशी भूमिका एमसीसीने मांडली होती.

काय झाला वाद?

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या टी-20 मध्ये डेव्हिड मलानने (David Malan) सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) कॅच पकडला. मैदानातल्या अंपायरनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवताना सॉफ्ट सिग्नल आऊट दिला. थर्ड अंपायरला मलानने कॅच नीट पकडला का नाही, याबाबत स्पष्ट दिसलं नाही, पण सॉफ्ट सिग्नल आऊट असल्यामुळे सूर्यकुमार यादवला आऊट देण्यात आलं.

सॉफ्ट सिग्नलच्या या मुद्द्यावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आक्षेप घेतला. तर माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रानेही यावर टीका केली. अंपायर 70 मीटर लांब पकडल्या गेलेल्या कॅचबाबत सॉफ्ट सिग्नल कसा देऊ शकतो? असा सवाल आकाश चोप्राने उपस्थित केला.

अंपायर कॉलचा नियम कायम राहणार

दुसरीकडे डीआरएसबाबतच्या अंपायर कॉलचा नियम कायम राहणार आहे. अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालच्या क्रिकेट समितीने हा नियम कायम ठेवण्याची शिफारस केली आहे.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Sports, Suryakumar yadav, Virat kohli