ICC ने केले क्रिकेटच्या तीन नियमांमध्ये बदल, जाणून घ्या

ICC ने केले क्रिकेटच्या तीन नियमांमध्ये बदल, जाणून घ्या

आयसीसीने (ICC) क्रिकेटच्या तीन नियमांमध्ये बदल (Cricket Rules Changed) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल : आयसीसीने (ICC) क्रिकेटच्या तीन नियमांमध्ये बदल (Cricket Rules Changed) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या सीरिजमध्ये (India vs England) अंपायर्स कॉल आणि डीआरएसच्या नियमांवरून मोठा वाद निर्माण झाला होता, तसंच हे नियम रद्द करण्याची मागणीही टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) केली होती. यानंतर आयसीसी क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट कमिटीची या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि अखेर हे नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आयसीसी क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी माहिती दिली की अंपायर्स कॉल कायम राहिल.

'अंपायर्स कॉलबाबत क्रिकेट कमिटीमध्ये चांगली चर्चा झाली. डीआरएसचा अर्थ मोठ्या चुका सुधारणं आहे. मैदानात अंपायरचे निर्णय सर्वतोपरी आहेत, त्यामुळे अंपायर कॉल कायम ठेवणं गरजेचं आहे,' असं कुंबळे म्हणाला.

डीआरएस आणि थर्ड अंपायरच्या नियमांमध्ये बदल

आयसीसी क्रिकेट कमिटी आणि बोर्डाने डीआरएस आणि थर्ड अंपायरच्या नियमांमध्ये तीन मोठे बदल केले आहेत. डीआरएसमध्ये विकेट झोनची उंची वाढवून स्टम्पच्या वरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आता अंपायर कॉल विकेटची उंची आणि लांबी समान असेल. तर दुसरा बदल एलबीडब्ल्यूच्या निर्णयाबाबत करण्यात आला आहे. एलबीडब्ल्यूचा रिव्ह्यू घेण्याआधी खेळाडू अंपायरशी चर्चा करू शकतो.

याशिवाय तिसरा बदल म्हणजे थर्ड अंपायरला आणखी ताकद देण्यात आली आहे. थर्ड अंपायर आता शॉर्ट रनचा निर्णय रिप्ले बघून घेईल. आयपीएल 2020 साली पंजाबच्या टीमला एक रन शॉर्ट देण्यात आली होती, यानंतर मॅच सुपरओव्हरमध्ये गेली आणि त्यांचा दिल्लीकडून पराभव झाला. या पराभवामुळे पंजाबचं खूप नुकसान झालं आणि त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नाही.

Published by: Shreyas
First published: April 1, 2021, 8:42 PM IST

ताज्या बातम्या