खेळाडूंसाठी खूशखुबर! फुटबॉलमधला 'तो' क्रिकेटमध्ये नियम लागू झाल्यानं होणार फायदा

खेळाडूंसाठी खूशखुबर! फुटबॉलमधला 'तो' क्रिकेटमध्ये नियम लागू झाल्यानं होणार फायदा

आयसीसीच्या वार्षिक बैठकीत क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

  • Share this:

लंडन, 19 जुलै : आयसीसीच्या वार्षिक बैठकीत क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. याआधी फुटबॉलमध्ये जखमी खेळाडूला बदली खेळाडू मिळतो, मात्र हा नियम क्रिकेटमध्ये लागू करण्यात आला नव्हता. दरम्यान आता आयसीसीच्या वतीनं हा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यामुळं खेळाडूंना याचा फायदा होणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्ात झालेल्या दुसऱ्या सेमीफायनलस्पर्धेत खेळाडूला दुखापत होऊनही खेळावे लागले होते. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स केरीला जोफ्रा आर्चरचा चेंडू हनुवटीवर आदळला आणि त्यातून रक्त वाहू लागले होते. तरीही केरीनं प्राथमिक उपचार घेत फलंदाजी केली. त्याने चेहऱ्यावर पट्टी बांधली होती. त्यामुळं हा नियम लवकरात लवकर क्रिकेटमध्ये यावा अशी मागणी खेळाडूंकडून येऊ लागली होती.दरम्यान याआधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या नियमाची अंमलबजावणी केली होती. 2016-17च्या स्थानिक वन डे, बिग बॅश आणि महिला बिग बॅश लीगमध्ये हा नियम वापरण्यात आला होता.

2017पासून सुरु होती चाचणी...

बदली खेळाडू मिळण्यासंदर्भात आयसीसीने 2017पासून स्थानिक स्पर्धामध्ये प्रयत्न सुरु केले होते. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुरुष आणि महिला वनडेमध्ये व बीबीएलमध्ये देखील हा नियम लागू केला होता. पण शेफील्ड शील्ड स्पर्धेत बदला खेळाडू संदर्भातील नियम लागू करण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आयसीसीची परवानगी घ्यावी लागली होती. ती त्यांनी 2017मध्ये देण्यात आली. गेल्या काही वर्षातील घटनांचा अभ्यास केल्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. अनेक वेळा खेळाडूंच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे संघांना कमी खेळाडूंसह सामना खेळावा लागला आहे. अशा परिस्थितीत संघाच्या कामगिरीवर देखील परिणाम होतो. म्हणूनच यापुढे बदली खेळाडू दिला जाणार आहे.

वाचा- इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा ओव्हर थ्रोचा नियम बदलणार!

अॅशेस मालिकेपासून होणार नियम लागू

चेंडू लागल्यामुळे जर एखादा खेळाडू जखमी झाला असेल तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संघात घेता येऊ शकते. संबंधित जखमी झालेला खेळाडू संघात ज्या भूमिकेत होता तशाच प्रकारचा दुसरा खेळाडू संघात घेता येईल. उदा- जर गोलंदाज चेंडू लागल्यामुळे जखमी झाला तर त्याच्या बदली दुसऱ्या गोलंदाजाला संधी दिली जाईल. एखादा फलंदाज जखमी झाला तर दुसऱ्या फलंदाजाला संधी मिळेल. अर्थात असे बदल करताना मॅच रेफरीची गरज लागले. येत्या 1 ऑगस्टपासून हा नियम लागू होईल. याची सुरुवात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेपासून सुरुवात होईल.

वाचा- क्रिकेटच्या नियमांमध्ये ICCने केले दोन मोठे बदल; निकालावर होणार परिणाम!

VIDEO : विषय शेतकरी कर्जमाफीचा पण प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंना हसू आवरेना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ICC
First Published: Jul 19, 2019 05:18 PM IST

ताज्या बातम्या