क्रिकेटच्या नियमांमध्ये ICCने केले दोन मोठे बदल; निकालावर होणार परिणाम!

क्रिकेटच्या नियमांमध्ये ICCने केले दोन मोठे बदल; निकालावर होणार परिणाम!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCने क्रिकेटमधील नियमात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

  • Share this:

लंडन, 19 जुलै: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCने क्रिकेटमधील नियमात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदललेल्या नियमांमुळे कर्णधारांना मोठा दिलासा मिळणार आहे. लंडनमध्ये झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हे निर्णय घेण्यात आले. धीम्यागतीने गोलंदाजी केल्याबद्दल यापुढे कर्णधारावर निलंबनाची कारवाई केली जाणार नाही. तर संपूर्ण संघाला दंड केला जाणार आहे. यामुळे आता धिम्यागतीने गोलंदाजी केल्यास कर्णधार आणि संघातील अन्य खेळाडूंना समान दंड केला जाणार आहे. तसेच या कारणामुळे निलंबनाची कारवाई केली जाणार नाही. तर आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप दरम्यान त्यांचे गुण कट केले जातील.

आतापर्यंतच्या नियमानुसार सामन्यात जर एखाद्या संघाने धिम्यागतीने गोलंदाजी केली तर कर्णधाराला मानधनाच्या 50 टक्के दंड केला जात असे. तर संघातील अन्य खेळाडूंच्या मानधनातून प्रत्येकी 10 टक्के रक्कम कपात केली जात असे. तर सलग 3 सामन्यात असे झाले तर कर्णधावर निलंबनाची कारवाई केली जात होती. पण यापुढे अशी कारवाई केली जाणार नाही. आयसीसीच्या नव्या नियमांमुळे कर्णधारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मिळणार बदली खेळाडू

आयसीसीने आणखी मोठा बदल केला आहे. चेंडू लागल्यामुळे जर एखादा खेळाडू जखमी झाला असेल तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संघात घेता येऊ शकते. संबंधित जखमी झालेला खेळाडू संघात ज्या भूमिकेत होता तशाच प्रकारचा दुसरा खेळाडू संघात घेता येईल. उदा- जर गोलंदाज चेंडू लागल्यामुळे जखमी झाला तर त्याच्या बदली दुसऱ्या गोलंदाजाला संधी दिली जाईल. एखादा फलंदाज जखमी झाला तर दुसऱ्या फलंदाजाला संधी मिळेल. अर्थात असे बदल करताना मॅच रेफरीची गरज लागले. येत्या 1 ऑगस्टपासून हा नियम लागू होईल. याची सुरुवात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेपासून सुरुवात होईल.

2017पासून सुरु होती चाचणी...

बदली खेळाडू मिळण्यासंदर्भात आयसीसीने 2017पासून स्थानिक स्पर्धामध्ये प्रयत्न सुरु केले होते. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुरुष आणि महिला वनडेमध्ये व बीबीएलमध्ये देखील  हा नियम लागू केला होता. पण शेफील्ड शील्ड स्पर्धेत बदला खेळाडू संदर्भातील नियम लागू करण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आयसीसीची परवानगी घ्यावी लागली होती. ती त्यांनी 2017मध्ये देण्यात आली. गेल्या काही वर्षातील घटनांचा अभ्यास केल्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. अनेक वेळा खेळाडूंच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे संघांना कमी खेळाडूंसह सामना खेळावा लागला आहे. अशा परिस्थितीत संघाच्या कामगिरीवर देखील परिणाम होतो. म्हणूनच यापुढे बदली खेळाडू दिला जाणार आहे.

SPECIAL REPORT: 'या' क्वाड्रासायकलमधून तुम्ही प्रवास केलात का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 07:23 AM IST

ताज्या बातम्या