LIVE NOW

भारताचा लंकेवर 7 गडी राखून विजय, रोहित-राहुलची शतके

गुणतालिकेत पहिला क्रमांक गाठण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे गरजेचे आहे.

Lokmat.news18.com | July 6, 2019, 10:57 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated July 6, 2019
auto-refresh

Highlights

10:57 pm (IST)
Load More
लीडस, 06 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये लंकेनं दिलेलं 264 धावांचं आव्हान भारताने रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या शतकांच्या जोरावर 43.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्माने 103 तर केएल राहुलने 111 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली 34 धावांवर नाबाद राहिला. लकेकडून लसिथ मलिंगाने रोहित शर्माची एकमेव विकेट घेतली. या विजयासह भारताचे 15 गुण झाले असून ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्यास भारतच अव्वल स्थानी राहिल. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं अॅजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या आणि लाहिरू थिरिमानेच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 7 बाद 264 धावा केल्या. लंकेची 12 व्या षटकांत 4 बाद 55 अशी अवस्था झाली असताना अॅजेलो मॅथ्यूज आणि लाहिरू थिरिमाने यांनी डाव सावरला. त्यांनी शतकी भागिदारी केली. भारताकडून बुमराहने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा आणि कुलदिप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.