मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /कोरोना संकटात भारतात T20 वर्ल्ड कप होणार का नाही? ICC च्या बैठकीत मोठा निर्णय

कोरोना संकटात भारतात T20 वर्ल्ड कप होणार का नाही? ICC च्या बैठकीत मोठा निर्णय

भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) आयोजनाबाबत आयसीसीच्या (ICC) आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत आयसीसीने बीसीसीआयची (BCCI) मागणी मान्य केली आहे.

मुंबई, 1 जून : खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाल्यामुळे यावेळची आयपीएल (IPL 2021) स्पर्धा बीसीसीआयला (BCCI) अर्ध्यातच स्थगित करावी लागली, यानंतर भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार का नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. त्यातच आयपीएलचे उरलेले सामने युएईमध्ये (UAE) खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्यामुळे वर्ल्ड कपही तिकडेच खेळवला जाईल, असं बोललं जाऊ लागलं, पण आयसीसीने (ICC) मात्र बीसीसीआयला मोठा दिलासा दिला आहे.

आयसीसीने बीसीसीआयला टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत निर्णय घ्यायला 28 जूनपर्यंतची वेळ दिली आहे. बीसीसीआयने 29 मे रोजी झालेल्या बैठकीत आयसीसीकडे टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी वेळ मागणार असल्याचं सांगितलं होतं, त्यानंतर आयसीसीनेही बीसीसीआयची ही मागणी मान्य केली.

युएईमध्ये वर्ल्ड कपचं आयोजन करणं हा दुसरा पर्याय आहे, पण भारतामध्येच वर्ल्ड कप व्हावा, अशी आमची प्राथमिकता असल्याचं बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं होतं.

First published:
top videos

    Tags: BCCI, Cricket news, Icc, T20 world cup