मुंबई, 17 मे : टीम इंडियाच्या (Team India) मॅचवर झालेल्या मॅच फिक्सिंगच्या (Match Fixing) आरोपांवर आयसीसीने (ICC) महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यात 2016 साली झालेली चेन्नई टेस्ट आणि भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 2017 साली रांचीमध्ये झालेली टेस्ट यांच्यात फिक्सिंग झाल्याचा आरोप अल जजीराने (al jazeera) 2018 साली केला होता. आयसीसीने मात्र अल जजीराचा हा दावा फेटाळून लावला आहे. हे पुरावे विश्वसनीय आणि पर्याप्त नसल्याचं आयसीसीने सांगितलं.
अल जजीराने केलेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याचा दावा केला होता, पण इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हा दावा नाकारला. इंग्लंडच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवरही स्पॉट फिक्सिंगचे आरोप करण्यात आले, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही हे आरोप फेटाळले. आता आयसीसीनेही स्पष्टीकरण दिल्यामुळे या वादावर पडदा पडला आहे.
ऑस्ट्रेलियात पुन्हा बॉल टॅम्परिंगचं भूत, या खेळाडूच्या चौकशीला सुर
चॅनलने कार्यक्रमात दाखवलेल्या गोष्टी असामान्य होत्या, यानंतर आयसीसीने चार स्वतंत्र अधिकारी आणि क्रिकेट तज्ज्ञांनी याची चौकशी केली. ही चौकशी झाल्यानंतर कार्यक्रमात दाखवलेले निष्कर्ष आधीपासूनच ठरवले होते. आयसीसीने यामध्ये सामील असलेल्या पाच जणांची नावं घेतली त्यांची मुलाखत घेतली, पण कोणताही पुरावा मिळाला नाही, असं आयसीसीकडून सांगण्यात आलं.
श्रीलंका क्रिकेटमध्ये बंड! भारत दौऱ्यापूर्वी खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी
आम्ही क्रिकेटमधल्या भ्रष्टाचारावरच्या रिपोर्टिंगचं स्वागत करतो. खेळामध्ये अशाप्रकारच्या वर्तनाला जागा नाही, पण ज्यांच्याविरुद्ध आरोप आहेत, त्यांच्याविरुद्ध पुरावेही मिळाले पाहिजेत. या कार्यक्रमात केलेले दावे असंभव आणि अविश्वसनीय होते. चारही अधिकाऱ्यांना चौकशीमध्येही हेच आढळलं, असं आयसीसीचे जनरल मॅनेजर एलेक्स मार्शल म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.