World Cup Final : 'तो' निर्णय घेऊन धर्मसेना यांनी काहीच चुक केली नाही-ICC

ICC cricket world cupच्या अंतिम फेरीतील वाद संपता संपत नाही आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 06:26 PM IST

World Cup Final : 'तो' निर्णय घेऊन धर्मसेना यांनी काहीच चुक केली नाही-ICC

लंडन, 21 जुलै: ICC cricket world cupच्या अंतिम फेरीतील वाद संपता संपत नाही आहेत. अंपायरच्या एका निर्णयामुळे पूर्ण सामनाच पलटला, त्या निर्णयावरून वाद सुरूच आहे. अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात बेने स्ट्रोक्स दोन धावा घेत असताना मार्टिन गुप्टिलचा थ्रो त्यांच्या बॅटला लागला आणि चेंडू सीमारेषेकडे गेला. त्यानंतर अंपायरनी इंग्लंडला 6 धावा दिल्या. सामना झाल्यानंतर पंचांनी दिलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे लक्षात आले. आयसीसीच्या नियमानुसार इंग्लंडला 5 धावा देणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात पंचांनी 6 धावा दिल्या.

या निर्णयामुळे अखेरच्या चेंडूवर इंग्लंडने एक धाव घेत सामना बरोबरीत सोडवला आणि त्यानंतर अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. तेथे देखील दोन्ही संघांनी समान धावा केल्या. मात्र इंग्लंडने सर्वाधिक चौकार मारल्यामुळे त्यांना विजेतपद देण्यात आले. अंतिम सामन्यात पंचांनी केलेल्या या खराब कामगिरीवर अनेकांनी टीका केली.

यानंतर टिव्ही रिप्लेमध्ये जेव्हा गुप्टिलनं चेंडू फेकला होता. तेव्हा राशिद आणि स्टोक्स यांनी दुसरा धाव पूर्ण केलाच नव्हता असे दिसले होते. त्यामुळं हा अंतिम सामना वादात सापडला होता. मात्र आता आयसीसीच्या प्रमुखांनी याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे.

आयसीसीचे प्रमुख ज्योफ एलडाईस यांनी क्रिकइन्फोशी बोलताना, "अंतिम सामन्यात जे काही घडले, त्यावेळी पंचांनी घेतलेला तो निर्णय होता. त्यांनी निर्णय घेण्यासाठी सर्व नियमांचे पालन केले आहे", असा खुलासा केला. तसेच, ज्योफ यांनी, "फलंदाजाने पिच पार केले होते की नाही, याबाबत सर्व नियम त्यांना माहित होते. तिसऱ्या पंचांचा निर्णय विचारण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्यामुळं पंचांच्या कोणत्याही निर्णयावर कमेंट करणं हे नियमाच्या विरुद्ध आहे. पंच मैदानावर नियमानुसार निर्णय घेतात आणि त्यावर आम्ही कोणतीही कमेंट करू शकत नाही", असे सांगितले.

धर्मसेना यांनी मान्य केली होती चूक

Loading...

वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर कुमार धर्मसेना यांनी आपली चूक मान्य केली होती. धर्मसेना यांनी, "माझा तो निर्णय चुकीचा होता. टीव्ही रिप्लेवर पाहिल्यानंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली. पण मैदानात आमच्याकडे टीव्ही रिप्ले पाहण्याची सुविधा नसते. त्यामुळे मी दिलेल्या निर्णयावर वाईट वाटत नाही. मी त्यावेळी जो निर्णय दिला होता. त्यावर आयसीसीने माझे कौतुक केले आहे", असे सांगितले होते. धर्मसेना यांनी त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे मान्य केले असले तरी त्यावर माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.

VIDEO: तुरुंगवारीनंतर ऐजाज खान गाऊ लागला मोदींची स्तुतीसुमने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 06:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...