डबलिन, 18 मे : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना पावसामुळे 24 षटकांचा खेळ होऊ शकला. वेस्ट इंडिजने 152 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमानुसार 210 धावांचे आव्हान देण्यात आलं. त्यासाठी बांगलादेशला 24 षटके होती. विशेष म्हणजे बांगलादेशने हे आव्हान केवळ 23 षटकांत पूर्ण केलं.
बांगलादेशचा कर्णधार म्हणाला की, या सामन्यात जे झालं ते झालं. आता आमचं लक्ष वर्ल्ड कप वर आहे. आमच्या कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. वर्ल्ड कप आमच्यासाठी आव्हानात्मक असेल मात्र हा विजय आम्हाला उत्साह देणारा आणि मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणारा आहे.
बांगलादेशने विजय मिळवला असला तरी डकवर्थ लुईस नियमाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. पहिल्यांदा या नियमाने वाद निर्माण झाला तो 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळण्यात आला होता. पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आला होता.
इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 13 चेंडूत 22 धावांची गरज होती. त्यावेळी पाऊस आल्याने सामना थांबवावा लागला. त्यानंतर सुधारीत लक्ष्य देण्यात आले अशक्यप्राय असेच होते. ते होते एका चेंडूत 22 धावांचे. यामुळे आफ्रिकेचा पराभव झाल्याने फायनल गाठता आली नाही. तेव्हाही डकवर्थ लुईस नियमाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.
VIDEO: भारतीय हवाई दल प्रमुखांकडून मिग 21 विमानाचं यशस्वी उड्डाण