World Cup : कोण होणार जग्गजेता? इंग्लंडच्या माजी कर्णधारानं केलं ट्विट

World Cup : कोण होणार जग्गजेता? इंग्लंडच्या माजी कर्णधारानं केलं ट्विट

'भारत अपराजित असला तरी एक संघ विजेता होऊ शकतो त्यासाठी भारताला पराभूत करावं लागेल.'

  • Share this:

लंडन, 28 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेच्या महासंग्रामाला एक महिना होत आला. महिन्याभरात स्पर्धेच्या पुढच्या फेरीत कोणते संघ पोहचतील याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. ऑस्ट्रेलियाने 12 गुण मिळवत सेमीफायनलचं तिकिट पक्कं केलं आहे. गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर भारत, तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड तर चौथ्या स्थानी इंग्लंड आहे.

चौथ्या स्थानावर चार संघ दावेदार ठरू शकतात. सध्या इंग्लंड या स्थानावर असले तरी बांगलादेश, लंका आणि पाकिस्तान हे संघही स्पर्धेत आहेत. इंग्लंडने पुढचे दोन्ही सामने गमावल्यास त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवू शकते. दुसरीकडे पाकिस्ताने गेल्या दोन सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तर लंकेला आफ्रिकेसह पुढच्या दोन्ही सामन्यात विजय आवश्यक आहे. बांगलादेशने उर्वरित सामन्यात विजय मिळवला तरी त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल.

दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारताच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे कौतुक केलं आहे. त्याने म्हटलं की, भारतीय संघ सध्या स्पर्धेत अपराजित आहे. भारताला जो संघ पराभूत करेल तो वर्ल्ड कप जिंकेल.

भारताने सहापैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसाने रद्द झाला. यामुळे भारतीय संघ 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित तीन सामने इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत. या तीनपैकी एका सामन्यात जरी भारताने विजय मिळवला तरी सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित होईल.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 06:19 PM IST

ताज्या बातम्या