वेस्ट इंडीजचा अफगाणिस्तानवर 23 धावांनी विजय

ICC Cricket world Cup 2019 स्पर्धेत अफगाणिस्तानला एकही विजय मिळवता आला नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 11:04 PM IST

वेस्ट इंडीजचा अफगाणिस्तानवर 23 धावांनी विजय

हेडिंग्ले, 04 जुलै : ICC Cricket world Cup मध्ये वेस्ट इंडीजने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला. अफगाणिस्तानने झुंज दिली मात्र ब्रेथवेट आणि रोचच्या माऱ्यासमोर त्यांचा प्रयत्न अपुरा पडला. रहमत शाह आणि इकराम अली यांचे अर्धशतक आणि नजीबुल्लाह झारदन, असगर अफगाण यांच्या खेळीच्या जोरावर 288 धावा केल्या. रहमत शाहने 62 तर इकराम अलीने 86 धावा केल्या. इतर खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. वेस्ट इंडीजक़डून ब्रेथवेटनं 4 तर केमार रोचनं 3 गडी बाद केले. गेलने इकराम अलीला बाद करून मोठा अडथळा दूर केला. या दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाही. तरीही त्यांनी बलाढ्य संघांना जोरदार टक्कर दिली.

विंडीज आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लुईस, होप आणि पूरनच्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने 50 षटकांत 6 बाद 311 धावा केल्या. अखेरचा वर्ल्ड कप सामना खेळणाऱ्या गेलला 7 धावांवर बाद करून दौलत झारदनने पहिला धक्का दिला. त्यानंतर लुईस आणि होपनं संघाच्या 100 धावा केल्या. लुईसला बाद करून राशिद खानने ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या हेटमायरनं फटकेबाजी करण्याचा प्रयतान केला पण झारदनने त्याला बाद करून मोठा झटका दिला.

शाय होप 77 धावांवर बाद झाला. त्याला नबीने बाद केलं. होपनंतर मनिकोलस पूरन आणि जेसन होल्डरनं 105 धावांची भागिदारी केली. दोघेही 49 व्या षटकात लागोपाठ बाद झाले. त्यानंतर ब्रेथवेटनं 4 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 14 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून झारदनने 2 तर शिऱझाद, नबी आणि राशिदने प्रत्येकी एक विकेट घेतली.

World Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला करावा लागेल हा चमत्कार!

मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

Loading...

SPECIAL REPORT: यशस्वी कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 10:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...