IND vs AFG : अफगाणिस्तान विरोधात भारताचा पेपर सोपा, पण वरुणराजा घालणार खोडा

IND vs AFG : अफगाणिस्तान विरोधात भारताचा पेपर सोपा, पण वरुणराजा घालणार खोडा

ICC Cricket World Cupमध्ये आतापर्यंत चार सामने पावसामुळं रद्द झाले आहेत.

  • Share this:

लंडन, 21 जून : ICC Cricket World Cupमध्ये सध्या सर्व संघाचे लीग स्टेजमधले सामने संपत आल्यामुळं सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्व संघानी आपले पाच सामने खेळले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियानं बांगलादेशला नमवल्यानंतर कमकुवत संघ स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळं हे संघ सेमीफायनलसाठी फिक्स झाले आहेत. भारतानं आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, यातील तीन सामन्यात विजय तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. शनिवारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात साऊदम्पटनच्या मैदानावर हा सामना रंगेल. स्थानिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या दिवशी पावसाची शक्यता कमी आहे आहे.

मात्र, बुधवारी पावसामुळं अभ्यास सत्र रद्द झाले होते. तर, गुरुवारी संथ प्रमाणात पाऊस बरसला. त्यामुळं दोन दिवस भारतीय संघाला सराव करता आला नाही. भारतीय संघ मैदानात सरावासाठी उतरल्यानंतर पावसामुळं त्यांना सराव थांबवावा लागला. गुरुवारी उशीरा पर्यंत पाऊस पडत होता, मात्र शुक्रवारी काही काळ वातवरण ढगाळ होते. अफगाणिस्तान संघानं आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळं त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

असे असेल हवामान

स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजेपर्यंत साऊदम्पटनमध्ये ऊन असेल. यानंतर वातावरण थोडं ढगाळ होऊन, जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या दिवसाचं तापमान 13 ते 20 डिग्री सेल्सिअ्सपर्यंत असेल.

भारताचा प्रवास सोपा

भारतानं आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यातील एक सामना पावसामुळं रद्द झाला त्यामुळं भारताकडे आता 7 गुण आहेत. भारताचे पुढील सामने हे बांगलादेश, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधात होणार आहे. यातील इंग्लंड विरुद्धचा सामना भारतासाठी कठिण असेल. भारतानं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांना नमवलं आहे तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावासामुळं रद्द झाला. त्यामुळं भारतानं आता बाकीचे सामने जिंकल्यास ते थेट सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो.

वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी, वर्ल्ड कप गाजवणारा अष्टपैलू खेळाडू फिट

वाचा- वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या विराटसेनेचं रुप पालटलं, PHOTO व्हायरल

वाचा- ...म्हणून पाक संघानं ऐकला नाही PM इमरान यांचा सल्ला

सानियासाठी 'रावळपिंडी एक्स्प्रेस' उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 02:20 PM IST

ताज्या बातम्या