World Cup : सेहवागकडून पोलखोल, सचिन सर्वात वाईट डान्सर तर, धोनी...

वर्ल्ड कपमध्ये समालोचन करताना सेहवागनं तीन ते चार मिनिटांच्या मुलाखतीमध्ये क्रिकेटपटूंचे मजेदार किस्से सांगितले.

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 03:27 PM IST

World Cup : सेहवागकडून पोलखोल, सचिन सर्वात वाईट डान्सर तर, धोनी...

लंडन, 21 जून : ICC Cricket World Cup 2019मध्ये भारतीय संघाची सध्या विजयी घौडदौड सुरु आहे. यात आता भारतीय संघानं उतांत्य फेरी आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, भारताचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग यानं आपल्या एका मुलाखतीत इंग्लंड हा आपला आवडता संघ असल्याचे जाहीर केले आहे. मात्र आता सेहवाग एका वेगळ्या कारणानं चर्चेत आला आहे. धडाकेबाज सलामी फलंदाज विरेंद्र सेहवाग हे आपल्या दिलखुलास बोलण्यासाठी ओळखला जातो. तसेच, त्याचे ट्विटसही चांगलेच गाजतात, मात्र नुकताच आयसीसीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सेहवागनं आपल्या माजी खेळाडूंची पोलखोल केली आहे.

आयसीसीच्या 'डिशींग द डर्ट' या कार्यक्रमात सेहवागला तुमच्या संघात कोण सर्वात वाईट डान्सर आहे, असे विचारताच त्यांनी महान फलंदाज सचिन तेंडूलकर याचे नाव घेतले. तसेच, त्यांनी सचिन हा सर्वोत्तम स्वयंपाकी असल्याचेही या मुलाखतीत सांगितले. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वर्ल्ड कपमध्ये समालोचन करताना सेहवागनं संघातील माजी खेळाडूंबाबत एका रॅपीड फायरमध्ये माहिती दिली. तीन ते चार मिनिटांच्या मुलाखतीमध्ये क्रिकेटपटूंचे मजेदार किस्से सांगितले. सेहवागला बाहेर टूरवर असताना कोणाबरोबर तुला रुम शेअर करायला आवडत नाही, असे विचारले असता त्यानं महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले. त्याचे कारण म्हणजे, "धोनी रुम बाहेर पडल्यावर अनेक लोकं त्याच्या मागे लागतात. त्यामुळे त्याच्याबरोबर राहण्यात अर्थ नाही", असे सांगितले. तसेच, विराट कोहली हा सेल्फी किंग असल्याचे त्यांनी सांगितले. तर, जहीर खान सर्वात चिडणारा खेळाडू असल्याचे त्याने सांगितले.

Loading...

वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी, वर्ल्ड कप गाजवणारा अष्टपैलू खेळाडू फिट

वाचा- वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या विराटसेनेचं रुप पालटलं, PHOTO व्हायरल

वाचा- ...म्हणून पाक संघानं ऐकला नाही PM इमरान यांचा सल्ला

सानियासाठी 'रावळपिंडी एक्स्प्रेस' उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...