भगव्या जर्सीबद्दल विराट म्हणतो, चांगली आहे पण...

भगव्या जर्सीबद्दल विराट म्हणतो, चांगली आहे पण...

ICC Cricket World Cup : इंग्लंडविरुद्ध भारत भगव्या रंगाच्या जर्सी घालणार आहे पण हीच नेहमी घालावी का? असा प्रश्न विराट कोहलीला विचारण्यात आला.

  • Share this:

लंडन, 29 जून : ICC Cricket World Cup मध्ये भारत इंग्लंडविरुद्ध निळ्या रंगाऐवजी भगव्या रंगाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. या जर्सीबद्दल शुक्रवारी बीसीसीआयने अधिकृत जाहीर केलं होतं. शनिवारी भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. कोहलीने नव्या रंगातील जर्सी आपल्याला आवडली असल्याचं म्हटलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताला ही भगव्या रंगातील जर्सी घालायची आहे. दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असेल तर एका संघाला वेगळ्या रंगातली जर्सी घालण्याची पद्धत फूटबॉलमध्ये वापरली जाते. त्याच धर्तीवर आयसीसीने क्रिकेटमध्ये हा प्रयोग केला आहे. याआधीच्या काही सामन्यात इतर संघांना जर्सी वेगळ्या रंगाची घालावी लागली आहे.

कर्णधार विराट कोहलीने भगव्या रंगातील जर्सीला 10 पैकी 8 गुण दिले. तो म्हणाला की, जर्सी चांगली दिसत आहे. एका सामन्यासाठी खूपच छान आहे. तसेच एक स्मार्ट किट आहे असंही विराटने सांगितलं.

भारताने यापुढे भगव्या रंगातील जर्सीत खेळावं का असा प्रश्न कोहलीला विचारण्यात आला. त्यावर कोहलीने सांगितलं की, भारताची जर्सी निळ्या रंगाचीच असावी. एका सामन्यापूरतं ठीक आहे. पण निळ्या रंगाची जर्सी ही आपली ओळख आहे ती कायम रहावी. मला नाही वाटत की सर्व सामन्यासाठी जर्सी बदलली पाहिजे.

भारत पहिल्यांदा भगव्या रंगाच्या जर्सीत खेळणार आहे. भारताची तरुण पिढी आणि बेधड वृत्तीची प्रेरणा म्हणून भगव्या रंगातील जर्सी निवडली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

भारताच्या या जर्सीचे अनावरण शुक्रवारी करण्यात आलं आहे. भगव्या रंगात असलेल्या जर्सीचा वापर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात होणार आहे. भारताच्या या रंगातील जर्सीवरून राजकारणही झालं. यावर आयसीसीने उत्तर दिलं असून बीसीसीआयला आयसीसीने जर्सीचे रंग आणि डीझाईन पाठवलं होतं असं स्पष्ट केलं आहे.

आयसीसीचे जर्सीबाबत काही नियम आहेत. या नियमानुसार एकाच रंगाची जर्सी घालून दोन संघांना सामन्यात उतरता येत नाही. त्यासाठी एका संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो. फुटबॉलच्या सामन्यात या नियमाचा वापर केला जातो. त्याच धर्तीवर क्रिकेटमध्ये हा नियम आयसीसीने अवलंबला आहे.

पाहा 'मेन इन ब्ल्यू' कसे दिसतात भगव्या रंगात, PHOTO VIRAL

World Cup Point Table : लंकेच्या पराभवाने तीन संघांमध्ये चुरस!

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

First published: June 29, 2019, 4:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading