World Cup : कर्णधाराचा रोहितला मुजरा, 'अशी संयमी खेळी मला कधीच जमणार नाही'

World Cup : कर्णधाराचा रोहितला मुजरा, 'अशी संयमी खेळी मला कधीच जमणार नाही'

रोहितने संयमी खेळी करत 144 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या.

  • Share this:

साउथॅम्पटन, 06 जून : भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन मिशन वर्ल्ड कपला दणक्यात सुरुवात केली आहे. पण या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधलं ते, हिटमॅन रोहित शर्मा यानं. त्याच्या संयमी शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली लवकर बाज झाला. त्यानंतर रोहित शर्मानं फलंदाजीची सूत्र आपल्या हाती घेतली.

रोहित शर्मानं 13 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर नाबाद 122 धावांची खेळी केली. रोहितनं विराट आणि धवन बाद झाल्यानंतर रोहितनं केएल राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र रबाडानं केएल राहुलला बादक केल्यानंतर मैदानावर आलेल्या कुल धोनीनं अतिशय संयमी फलंदाजी केली. रोहित आणि धोनी यांनी चौथ्या विकेटसाठी 74 धावांची खेळी केली. यामुळं भारताचा विजय निश्चित झाला. दरम्यान नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. चहल आणि बुमराह यांनी जबरदस्त गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला नमवले. आफ्रिकेकडून फक्त क्रिस मॉरिस (42) आणि रबाडा (31) यांनी शेवटी आक्रमक फलंदाजी केली. याच जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 227 धावा केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना धोनी बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्यानं धमाकेदार फलंदाजी केली आणि विजयावर शिक्कामोर्ताब केला.

दरम्यान भारताचा हा पहिला सामना होता. त्यामुळं मिशन वर्ल्ड कपच्या विजयी सुरुवातीवर कर्णधार विराट कोहली चांगलाच खुश आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात विराट कोहलीची बॅट तळपली नसली तरी, विराट कोहली भारताच्या विजयावर खुश आहे. पण सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, विराटनं त्याच्या या खेळीचं कर्णधार विराट कोहलीनेही कौतुक केलं. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. यावेळी विराटनं रोहितच्या शतकी खेळीची तारिफ केली. “माझ्या मते रोहित शर्माची वन-डे क्रिकेटमधली आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी होती. कारण वर्ल्ड सारख्या स्पर्धेत पहिला सामना खेळताना तुमच्यावर थोडासा दबाव हा असतोच. ज्यावेळी तुम्ही फलंदाजीसाठी उतरता आणि एखाद दुसरा चेंडू अनपेक्षित उसळी घेतो तेव्हा शांत चित्ताने फलंदाजी करणं ही सोपी गोष्ट नाहीये. अशावेळी फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या मोहात पडतो. मात्र रोहितने संयमीपणे खेळ करत डावाला आकार दिला, आणि त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूकडून आम्हाला अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.”

रोहितनं मिळवले दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

दक्षिण आफ्रिकेविरोधात अर्धशतक पुर्ण करताच रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा ओलांडला. आफ्रिकेविरुद्ध सामन्याआधी रोहित शर्माच्या खात्यात 11 हजार 926 धावा जमा होत्या. 12 हजार धावा पूर्ण करण्यासाठी रोहितचा ७४ धावांची गरज होती. त्या धावा करत रोहितने हा पल्ला गाठला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित नववा खेळाडू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विरेंद्र सेहवाग, मोहम्मद अझरुद्दीन आणि सुनिल गावसकर यांनी हा पल्ला गाठला आहे

15 ओव्हरमध्ये बनवतो बुलेट ट्रेन सारख्या धावा

रोहितची आकडेवारी पाहिली तर, आपल्या लक्षात येईक की, 11 ते 35 ओव्हरमध्ये रोहितनं धावा केल्या आहेत. यात रोहित 8व्या क्रमांकावर आहे. मात्र शेवटच्या 15 ओव्हरमध्ये रोहितनं सर्वात जलद धावा केल्या आहेत. पहिल्या10 ओव्हरमध्ये रोहितचा स्ट्राईक रेट 75 आहे तर, 11 ते 35 ओव्हरमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 101.22 आहे. तर, शेवटच्या 15ओव्हरमध्ये रोहित 153.56च्या स्ट्राईक रेटनं धावा करतो. तरी त्याला धिम्या गतीचा फलंदाज म्हटले जाते.

वाचा- World Cup : भारताच्या ‘या’ शिलेदारांनी फेरले दक्षिण आफ्रिकेच्या आशांवर पाणी

वाचा- VIDEO : फक्त 120 सेकंदात पाहा कशी केली रोहितनं आफ्रिकन सफाई !

वाचा-World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: June 6, 2019, 10:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading