World Cup : सेमीफायनलआधी विराटनं दिला न्यूझीलंडला इशारा, म्हणाला...

World Cup : सेमीफायनलआधी विराटनं दिला न्यूझीलंडला इशारा, म्हणाला...

भारताचा सेमीफायनलचा सामना हा मंगळवारी न्यूझीलंडविरोधात होणार आहे.

  • Share this:

लंडन, 07 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं आपल्या जबरदस्त फॉर्मच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल क्रमांक गाठला आहे. श्रीलंकेविरोधात भारताचा शेवटचा साखळी सामना झाला. या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर एकहाती विजय मिळवला. श्रीलंकेनं दिलेल्या 265 धावांचे आव्हान रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं 43.3 षटकात सात विकेट राखत पूर्ण केले.

दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव सहन करावा लागला त्यामुळं भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. यामुळंच भारताचा सेमीफायनलचा सामना हा मंगळवारी न्यूझीलंडविरोधात होणार आहे. मात्र, सध्या भारतीय संघाचा कर्णधार आपल्या खेळाडूंच्या फॉर्मवर चांगलाच खूश आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं, "आम्ही या स्पर्धेत सात सामने जिंकू आणि 1 हरू असे अजिबात वाटले नव्हते", असे सांगितले. भारताला इंग्लंडनं पराभूत केले आहे तर, न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला.

सामन्यानंतर कोहलीनं, "आम्हाला चांगला खेळ करायचा होता. सेमीफायनलमध्ये आम्ही एका पराभवसह जात आहोत. त्यामुळं याचून आम्ही खुप शिकलो आहोत. या सगळ्यामुळं आम्हाला फक्त स्वत:चा खेळ महत्त्वाचा आहे. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे, याचा फरक पडत नाही", असा खुलासा केला. भारत मंगळवारी न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे. न्यूझीलंडविरोधातील साखळी सामन्यातील सामना पावसामुळं रद्द झाला होता. तसेच, पहिल्यांदाच भारत-न्यूझीलंड यांच्यात सामना होत आहे.

44 वर्षांनंतर उतरणार मॅंचेस्टरच्या मैदानात

भारत-न्यूझीलंड हे दोन्ही संघ 44 वर्षांनंतर आमने-सामने येणार आहेत. 1975मध्ये पहिल्यांदा या दोन्ही संघात लढत झाली होती. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सात वेळा वर्ल्ड कपमध्ये लढत झाली आहे. यात भारतानं 3 तर न्यूझीलंडनं 4 सामने जिंकले आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा पगडा भारी

दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 106 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात 55 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे तर, 45 सामन्यात न्यूझीलंडनं. तर, पाच सामने रद्द झाले आहेत. सध्या गुणतालिकेत न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं पाच सामने जिंकले आहेत तर, 3 सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला होता.

वाचा- World Cup : 5 शतक करूनही नाही खूश, 8 वर्षांपासून रोहितच्या मनात खदखद

वाचा- धोनीनं झिवा आणि ऋषभ पंतसोबत धरला ठेका, मिस करू नका हा VIDEO

वाचा- Happy Birthday : झिरो ते हिरो; धोनीच्या करिअरमधील 20 खास 

VIDEO: भाताची लावणी करताना गायलेली ही पारंपरिक गीत तुम्ही ऐकलीत का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 12:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading