IND vs NZ : रोहित लगावणार आणखी 2 शतक आणि भारत जिंकणार वर्ल्ड कप, विराटनं केली भविष्यवाणी

IND vs NZ : रोहित लगावणार आणखी 2 शतक आणि भारत जिंकणार वर्ल्ड कप, विराटनं केली भविष्यवाणी

रोहित शर्मानं या वर्ल्ड कपमध्ये 5 शतक लगावले आहेत. तर वर्ल्ड कपमध्ये 647 धावा केल्या आहेत.

  • Share this:

मॅंचेस्टर, 08 जुलै : ICC Cricket World Cup 2019 आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी भारत-न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा पहिला सामना होणार आहे. साखळी सामन्यात भारत-न्यूझीलंड यांच्यातील लढत पावासामुळं रद्द करण्यात आली होती. मॅंचेस्टरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळं चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.

दरम्यान विराटनं सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत फलंदाजांचे आणि गोलंदाजांचे कौतुक केले. तसेच, "रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमधला सर्वात धडाकेबाज फलंदाज आहे", असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर रोहित वर्ल्ड कपमध्ये आणखी दोन शतक लगावणार असेही भाकित केले. रोहितनं वर्ल्ड कपमध्ये पाच शतक लगावण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळं रोहितचे शतक भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार असा विश्वास विराटनं व्यक्त केला.

रेकॉर्डपेक्षा वर्ल्ड कप महत्त्वाचा

विराट कोहलीनं रोहित शर्माच्या रेकॉर्ड बाबत, "आमचे खेळाडू स्वत:साठी खेळत नाहीत त्यामुळं रेकॉर्डपेक्षा वर्ल्ड कप महत्त्वाचा आहे", असे मत व्यक्त केले होते. दरम्यान श्रीलंका विरोधात झालेल्या सामन्याआधी रोहितनंही असेच मत व्यक्त केले होते.

वर्ल्ड कपमध्ये रो'हिट'

रोहित शर्मानं या वर्ल्ड कपमध्ये 5 शतक लगावले आहेत. सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित 647 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. रोहितनं गेल्या 34 सामन्यात एकूण 10 शतक लगावले आहे तर, 2063 धावा पूर्ण केल्या आहेत. जगातल्या कोणत्याच फलंदाजाने एका वर्षात 10 शतक लगावलेले नाहीत. त्यामुळं न्यूझीलंड विरोधातही अशाच खेळीची अपेक्षा आहे.

44 वर्षांनंतर उतरणार मॅंचेस्टरच्या मैदानात

भारत-न्यूझीलंड हे दोन्ही संघ 44 वर्षांनंतर आमने-सामने येणार आहेत. 1975मध्ये पहिल्यांदा या दोन्ही संघात लढत झाली होती. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सात वेळा वर्ल्ड कपमध्ये लढत झाली आहे. यात भारतानं 3 तर न्यूझीलंडनं 4 सामने जिंकले आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा पगडा भारी

दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 106 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात 55 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे तर, 45 सामन्यात न्यूझीलंडनं. तर, पाच सामने रद्द झाले आहेत. सध्या गुणतालिकेत न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं पाच सामने जिंकले आहेत तर, 3 सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला होता.

वाचा- यॉर्कर किंग बुमराहनं सांगितला भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा फॉर्म्युला

वाचा- इंग्लंड असो की ऑस्ट्रेलिया World Cup भारतच जिंकणार, 'हा' घ्या ठोस पुरावा!

वाचा- World Cup: टीम इंडियाकडे शेवटची संधी; 44 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेणार!

VIDEO: 'दुपारच्या प्रहरी, अश्व धावले रिंगणी', पाहा नयनरम्य रिंगण सोहळा

First published: July 8, 2019, 6:59 PM IST

ताज्या बातम्या