World Cup : अखेर चिंता मिटली, कोहलीनं सांगितले चौथ्या क्रमांकाच्या खऱ्या दावेदाराचे नाव

World Cup : अखेर चिंता मिटली, कोहलीनं सांगितले चौथ्या क्रमांकाच्या खऱ्या दावेदाराचे नाव

दरम्यान भारतीय निवड समितीनं भारताच्या संभाव्य संघात चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकर या नवख्या खेळाडूची निवड केली होती.

  • Share this:

लंडन, 29 मे : विश्वचषकासाठी आता केवळ काही तासांचा कालावधी उरला आहे. त्यामुळं यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ मैदानात उतरण्यास सज्ज आहे. दरम्यान भारताचे दोन्ही सराव सामने झाले आहे. न्युझीलंड विरुद्धच्या सराव सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला असला तरी बांगलादेश विरोधात भारतानं ती कसर भरुन काढली. दरम्यान भारताचा पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे.

दरम्यान भारतीय निवड समितीनं भारताच्या संभाव्य संघात चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकर या नवख्या खेळाडूची निवड केली होती. मात्र न्युझीलंड विरोधात दुखापतीमुळं तो खेळू शकला नाही तर, बांगलादेश विरोधात त्याला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं आता चौथ्या क्रमांकाचा दावेदार कोण हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. मात्र याबाबत कोहलीनं बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यानंतर मोठे विधान केले.

बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात सलामीचे फलंदाज फेल झाल्यानंतर राहुलनं फलंदाजीची धुरा सांभाळली आणि यशस्वी शतकी खेळी केली. तर, धोनीच्या समवेत त्यानं 104 धावांची भागीदारीही केली. यामुळं भारतानं बांगलादेशसमोर 360 धावांचे आव्हान ठेवले. राहुलच्या या खेळीबाबत कोहलीनं त्याची प्रशंसा करत, “केएल राहुलची खेळी आमच्यासाठी महत्त्वपुर्ण होती. त्यानं चांगली फलंदाजी केली त्यामुळं स्कोअरबोर्ड हलता राहिला. तो एक चांगला फलंदाज आहे, आणि आज ते सर्वांनीच पाहिले”. कोहलीच्या या विधानामुळं भारताच्या चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटला आहे, असे दिसत आहे.

राहुलच्या शतकामुळं या तीन खेळाडूंचा पत्ता कट

केएल राहुलला संघात राखीव सलामीवीर म्हणून घेतले असले तरी, बांगलादेश विरोधात त्यानं 99 चेंडूत 108 धावांची खेळी केली. या खेळीत त्यानं 12 चौकार आणि 4 षटकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट 109.09 होता. त्यामुळं आता चौथ्या क्रमांकाची चिंता मिटली आहे. मात्र, केएल राहुलच्या या शतकी खेळीमुळं भारतीय संघातील तीन खेळाडूंना धक्का बसणार आहे. यातील पहिला खेळाडू आहे, विजय शंकर. विजय शंकरला संघात चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून घेतले होते. मात्र बांगलादेशविरोधात त्याला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं त्याचा पत्ता कट होण्याच्या मार्गावर आहे. तर, केदार जाधव दुखापतग्रस्त असल्यामुळं दोन्ही सराव सामन्यांना तो मुकला, त्यामुळं त्याला वर्ल्डकपलाही मुकावे लागणार आहे. दिनेश कार्तिकचे संघात स्थान तसेही निश्चित नाही. कारण त्याला राखीव यष्टीरक्षक म्हणून स्थान देण्यात आले होते. त्यामुळं धोनीच्या अनुपस्थितीत त्याला संघात स्थान मिळणार आहे.

वाचा- आता हेच राहिलं होतं, धोनी झाला बांगलादेशचा कर्णधार!

वाचा-World Cup : केएल राहुलच्या एका शतकामुळं होणार 'या' तीन खेळाडूंचा पत्ता कट

वाचा-धोनीनं लावली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO व्हायरल

टीम इंडियाचा विजय मोठ्या पडद्यावर, '83' सिनेमाच्या निमित्तानं आदिनाथ कोठारेशी गप्पा

First published: May 29, 2019, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading