लंडन, 07 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. याआधीच भारतानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. साखळी सामन्यात श्रीलंकेला नमवत, भारत सध्या गुणातालिकेत अव्वल क्रमांकावर पोहचला आहे. मंगळवारी भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दरम्यान, श्रीलंकेविरोधात रोहित शर्मानं 102 धावांची विक्रमी खेळी केली. रोहित शर्माच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये पाच शतक करण्याचा विक्रम आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा रोहित पहिला फलंदाज ठरला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर विराटनं रोहितची मुलाखत घेतली. यावेळी विराटनं रोहितचे कौतुक करत, रोहित आमच्यासाठी कोहिनूर असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, "रोहितकडून पुढील दोन सामन्या मोठ्या खेळीची अपेक्षआ आहे", असेही विराट म्हणाला. मात्र, असे असले तरी रोहित आनंदी नाही आहे, त्याचे कारण म्हणजे 8 वर्षांपूर्वी त्याला एक धक्का मिळाला होता. 2011च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या जागी युसूफ पठाणला संधी देण्यात आली होती.
विराट कोहलीनं आपल्या मुलाखतीत या संदर्भातही प्रश्न विचारले, "2011च्या वर्ल्ड कपमध्ये तुला संधी मिळाली नाही. त्यानंतर 2015मध्ये भारत पराभूत झाला. या वर्ल्ड कपची तयारी कशी केलीस", असा सवाल विचारला. यावर रोहितनं, "वर्ल्ड कप ही मोठी स्पर्धा आहे. पण हा वर्ल्ड कप असला तरी, हे एक क्रिकेट आहे. सामना जिंकण्यासाठी तो खेळणेही महत्त्वाचे आहे. 2011ला संघात घेतले नाही तेव्हा वाईट वाटले होते मात्र आता फक्त वर्ल्ड कप जिंकायचा आहे'', असे उत्तर दिले.
MUST WATCH: @imVkohli & @ImRo45 in conversation - Does it get any better than this? 😎😎 You cannot miss this one - by @RajalArora
— BCCI (@BCCI) July 7, 2019
For all of VK's & Hitman's Q & A click here 👉👉 https://t.co/xuPRQx7mB9 pic.twitter.com/nBxxONN9nb
या वर्ल्ड कपमध्ये रोहितची कमाल
रोहित शर्मानं या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या विरोधात शतकी खेळी केली आहे. वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 647 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
रोहित शतकांचा बादशाह
2011च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर 2012मध्ये रोहितनं 2 शतक केले होते. 2015मध्ये रोहितनं एकूण 22 शतक केले होते. शतक करण्यात रोहितनं विराटला मागे टाकले आहे.
वाचा- World Cup : 5 शतक करूनही नाही खूश, 8 वर्षांपासून रोहितच्या मनात खदखद
वाचा- धोनीनं झिवा आणि ऋषभ पंतसोबत धरला ठेका, मिस करू नका हा VIDEO
वाचा- Happy Birthday : झिरो ते हिरो; धोनीच्या करिअरमधील 20 खास
VIDEO: भाताची लावणी करताना गायलेली ही पारंपरिक गीत तुम्ही ऐकलीत का?