World Cup : मैदान तर जिंकलं, पण चाहत्यांच्या 'या' कृतीमुळे विराटनं मागितली स्मिथची माफी

World Cup : मैदान तर जिंकलं, पण चाहत्यांच्या 'या' कृतीमुळे विराटनं मागितली स्मिथची माफी

भारतीय चाहत्यांच्या या एका प्रकारामुळं चाहत्यांवर भडकला विराट कोहली.

  • Share this:

ओव्हल, 10 मे : ICC Cricket World Cup 2019 दक्षिण आफ्रिकेनंतर, भारतानं कांगारुंची शिकार केली, त्यामुळं वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ सध्या विजय घौडदौडीवर आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवत 36 धावांनी विजय मिळवला. त्यामुळं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये खेळणारा भारतीय संघ चांगल्याच जोशात दिसत आहे.

भारत आपला पुढचा सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतानं प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यात, रोहित शर्मा-शिखर धवन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर आणि शिखर धवनच्या 117 धावांची खेळी चर्चेचा विषय ठरली. तर, विराट कोहलीच्या 82 धावांच्या आक्रमक खेळीनं सर्वांचे लक्ष वेधले. विराटनं आपल्या फलंदाजीनं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची झोप उडवली. मात्र या सामन्यात एक असा प्रसंग घडला ज्या प्रसंगानं विराटनं सर्वांचेच मन जिंकले.

विराट कोहली फलंदाजी करत असताना, भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ याला चीटर, चीटर म्हणण्यास सुरुवात केली. स्मिथचे हुटिंग पाहता विरट कोहलीनं भारतीय चाहत्यांना समज देत, स्मिथसाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले. एवढेच नाही तर विराटनं सामन्यानंतर स्मिथची माफीही मागीतली.

चेंडू कुरतडण्याप्रकणात शिक्षा पूर्ण करून राष्ट्रीय संघात कमबॅक करणाऱ्या स्मिथ व डेव्हिड वॉर्नरसाठी हुटिंगचा प्रकार नवीन नाही. याआधी सराव सामन्यातही त्याना चीटर चीटर असं संबोधित करण्यात आले होते. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात चाहते जाणीवपूर्वक स्मिथला डिवचत आहेत. पण, कोहलीनं चाहत्यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांना स्मिथसाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले. या प्रसंगानं स्मिथही भारावून गेला, आणि त्यानं कोहलीशी हस्तांदोलन केले. दरम्यान नेटेकरही विराटच्या या Spirit of cricket वर खुश आहेत.

VIDEO विधानसभा निवडणुकीची तयारी आजपासून सुरू - मुख्यमंत्री

First published: June 10, 2019, 9:15 AM IST

ताज्या बातम्या