World Cup : भारताला मोठा दिलासा, आफ्रिकेला धक्का देण्यासाठी कॅप्टन झाला फिट

भारताविरुद्धचा सामना हा साऊथ आफ्रिकेसाठी करो वा मरोचा असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 10:42 AM IST

World Cup : भारताला मोठा दिलासा, आफ्रिकेला धक्का देण्यासाठी कॅप्टन झाला फिट

लंडन, 03 मे : आयसीसी वर्ल्ड कपमध्ये सध्या भारतीय संघाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दरम्यान भारतानं आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही, भारताचा पहिला सामना साऊथ आफ्रिकेविरोधात 5 जून रोजी होणार आहे. दरम्यान साऊथ आफ्रिकेसाठी हा सामना करो वा मरोचा सामना असणार आहे. कारण साऊथ आफ्रिकेच्या संघानं न्युझीलंड आणि बांगलादेश विरोधात झालेल्या सामन्यात मानहानीकारक पराभव मिळवला. त्यामुळं भारताविरोधात सामना गमावल्यास त्याचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येऊ शकते.

दरम्यान रविवारी सरावादरम्यान कर्णधार विराट कोहलीच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे, तो साऊथ आफ्रिकेविरोधात खेळणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विराटची ही दुखापत गंभीर नसून, त्याला पहिल्या सामन्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. टीमचे फिजीओ पैट्रीक फहर्ट विराट कोहलीच्या अंगठ्याला पट्टी बांधताना दिसले. त्यामुळं साउथ आफ्रिकेविरोधात सामन्याला केवळ 2 दिवस उरले असताना, विराटची ही दुखापच सर्वांचीच धाकधूक वाढवणारी होती. मात्र आता तो फिट असून 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबत माहिती दिली आहे. सरावा दरम्यान मैदानाबाहेर गेल्यानंतर विराटनं काही काळानंतर पुन्हा एकदा नेट्समध्ये सराव केला. त्यामुळे आता चाहत्यांसाठी ही आनंदाती बातमी असणार आहे. दरम्यान न्युझीलंड विरोधात झालेल्या सराव सामन्यात भारतानं पराभव स्विकारल्यानंतर, बांगलादेश विरोधात विराटनं 47 धावांची खेळी केली. त्याचबरोबर कोहली गेल्या वर्षभरात चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळं साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विराटकडे विशेष लक्ष असणार आहे.

रविवारी विराट कोहली, केदार जाधव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, भुवनेश्वर कुमार आणि विजय शंकर यांनी जिममध्ये एकत्र व्यायाम केला. यावेळीही केदार जाधव फिट दिसत होता, त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



चौथ्या क्रमांकाचा दावेदार कोण

भारतीय संघासाठी मधली फळी हा चिंतेचा विषय होता, मात्र आता तोही प्रश्न सुटला आहे असे वाटले असताना, विराटच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत. बांगलादेश विरोधात झालेल्या सराव सामन्यात केएल राहलुनं चौथ्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजी करत शतकी खेळी केली. या त्याच्या खेळीच्या जोरावर त्यानं संघातील आपले स्थान पक्के केले असे वाटत असताना, आता ते स्थान धोक्यात आले आहे. खांद्याच्या दुखापतीमुळं सराव सामन्या संघाबाहेर असलेला केदार जाधन यानं रविवारी नेट प्रॅक्टीसमध्ये सहभाग घेतला. दरम्यान साऊथ आफ्रिकाविरोधात होणाऱ्या पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळणार का, याबाबत साशंकता आहे.

वाचा- World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

वाचा- World Cup : तब्बल सातवेळा कागदावर कमकुवत वाटणारे संघ ठरले जायंट किलर !

वाचा- World Cup : बांगलादेशी वाघांसमोर आफ्रिकेची शरणागती, काय आहेत कारणं?


VIDEO : 'उदयनराजे तुम्ही आमच्यासाठी वंदनीय, पण पुरंदरेंना आम्ही...', संभाजी ब्रिगेड आक्रमक



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 10:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...