World Cup : धोनीच्या निवृत्तीवर पहिल्यांदाच बोलला विराट, सेमीफायनलआधी दिली 'ही' प्रतिक्रिया

World Cup : धोनीच्या निवृत्तीवर पहिल्यांदाच बोलला विराट, सेमीफायनलआधी दिली 'ही' प्रतिक्रिया

मंगळवारी भारत-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सेमीफायनल सामन्याआधी विराटनं पत्रकारांशी संवाद साधला.

  • Share this:

मॅंचेस्टर, 08 जुलै : ICC Cricket World Cup 2019मध्ये मंगळवारी भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनल सामना होणार आहे. याआधी आज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विराटनं संघाबद्दलच्या गोष्टींवर खुलासा केला तसेच धोनीच्या निवृत्तीवरही त्यानं भाष्य केले. पत्रकार परिषदेत विराटला धोनी संदर्भात विचारले असता, "धोनी सारख्या खेळाडूबाबत नेहमीच सन्मान असेल. तुम्ही धोनीबाबत कोणालाही विचारा ते चांगलच सांगणार. जेव्हा एखादी व्यक्ती देशासाठी एवढं करते, तेव्हा आदर जास्त वाढतो", असे मत व्यक्त केले.

याआधी धोनी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार अशा बातम्यांना उधाण आले होते. त्यानंतर धोनीनेच यावर प्रतिक्रिया दिली होती. आता विराट कोहलीने, "धोनीच्या नेतृत्वाखाली मी खेळायला सुरुवात केली याचा मला अभिमान आहे. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सध्या आम्ही फक्त सेमीफायनलबद्दल विचार करत आहोत", असेही सांगितले.

दरम्यान पत्रकार परिषदेत विराटनं विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आमने-सामने येणार आहे. दोघेही 11 वर्षांपूर्वी 2008 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भिडले होते. तेव्हाही दोघे आपआपल्या देशाचं नेतृत्व करत होते. या आठवणींनाही उजाळा दिला.

विराट-विल्यम्सन पुन्हा आमने सामने

2008 मध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलला पोहचले होते. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत भारताला 205 धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यात विराटने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करत 7 षटकांत 27 धावा देत 2 बळी घेतले होते. भारताने तेव्हा सेमीफायनलच नाही तर फायनलमध्ये आफ्रिकेला पराभूत करून अंडर 19 वर्ल्ड कपही जिंकला होता. सेमीफायनलच्या त्या सामन्यात पावसामुळे भारताला 43 षटकांत 191 धावांचे आव्हान मिळाले होते. भारताकडून श्रीवत्स गोस्वामीने 51 आणि कोहलीने 43 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 9 चेंडू आणि 3 गडी राखून जिंकला होता. विराटच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता.

44 वर्षांनंतर उतरणार मॅंचेस्टरच्या मैदानात

भारत-न्यूझीलंड हे दोन्ही संघ 44 वर्षांनंतर आमने-सामने येणार आहेत. 1975मध्ये पहिल्यांदा या दोन्ही संघात लढत झाली होती. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सात वेळा वर्ल्ड कपमध्ये लढत झाली आहे. यात भारतानं 3 तर न्यूझीलंडनं 4 सामने जिंकले आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा पगडा भारी

दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 106 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात 55 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे तर, 45 सामन्यात न्यूझीलंडनं. तर, पाच सामने रद्द झाले आहेत. सध्या गुणतालिकेत न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं पाच सामने जिंकले आहेत तर, 3 सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला होता.

वाचा- यॉर्कर किंग बुमराहनं सांगितला भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा फॉर्म्युला

वाचा- इंग्लंड असो की ऑस्ट्रेलिया World Cup भारतच जिंकणार, 'हा' घ्या ठोस पुरावा!

वाचा- World Cup: टीम इंडियाकडे शेवटची संधी; 44 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेणार!

VIDEO: 'दुपारच्या प्रहरी, अश्व धावले रिंगणी', पाहा नयनरम्य रिंगण सोहळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 04:33 PM IST

ताज्या बातम्या