World Cup : विराट कोहलीचा मोठा खुलासा, टीममधला ‘हा’ खेळाडू आहे माझ्या विरोधात

सरावादरम्यान कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. मात्र आता तो तंदुरुस्त असून, साऊथ आफ्रिकेविरोधात खेळणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 12:34 PM IST

World Cup : विराट कोहलीचा मोठा खुलासा, टीममधला ‘हा’ खेळाडू आहे माझ्या विरोधात

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. दरम्यान विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला हा संघ 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळं सर्वांच्या नजरा या संभाव्य संघाकडे आणि विराट कोहलीवर असणार आहे.

या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या खेळीवर विशेष लक्ष आहे. कारण त्यांच्या फलंदाजीचे चाहते फक्त भारतातच नाही तर, जगभरात आहे. पण विराट कोहलीच्या मते, तो फक्त एक चांगला फलंदाज नसून चांगला गोलंदाजही आहे. पण त्याच्या या टॅलेंटकडे संघातील खेळाडूच दुर्लक्ष करत असल्याचे मत विराट कोहलीनं केले आहे.

कोहली एक मुलाखती दरम्यान, मी गोलंदाजी करण्यातही तरबेज आहे. मात्र, 2017नंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केलेली नाही, याचं कारण आहे संघातील काही खेळाडू.

Loading...

कोहलीनं हॉट स्टारला दिलेल्या मुलाखतीत कोहलीमं 2017 साली श्रीलंकेत झालेल्या एकदिवसीय मालिकेत शेवटची गोलंदाजी केली होती. त्यानंतर मी धोनीला गोलंदाजी करु शकतो का विचारले होते. मी गोलंदाजीसाठी तयारही होतो. पण बुमराह बाऊंड्री लाईनवरुन जोरात ओरडला, ही आंतरराष्ट्रीय मॅच आहे, मस्करी नाही, अशी थट्टा केली.

दरम्यान यावेळी कोहली, भारतीय संघात कोणीही माझ्या गोलंदाजीवर विश्वास ठेवत नाही, असेही मस्करीत म्हणाला.

दरम्यान यावेळी कोहलीनं, भारतीय संघात कोणीही माझ्या गोलंदाजीवर विश्वास ठेवत नाही, असेही मस्करीत म्हणाला.

रविवारी नेट प्रक्टिसमध्ये कोहलीनं गोलंदाजीचा सराव केला. यावेळी कोहली चांगल्या लयीत दिसला. सरावादरम्यान कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळं तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता असताना आता तो तंदुरुस्त असून, साऊथ आफ्रिकेविरोधात खेळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 12:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...