World Cup : विराटनं शेअर केलं लग्नानंतरच मोठं गुपित, अनुष्कामुळं आयुष्यात झाला 'हा' बदल

World Cup : विराटनं शेअर केलं लग्नानंतरच मोठं गुपित, अनुष्कामुळं आयुष्यात झाला 'हा' बदल

फलंदाज ते कर्णधार या प्रवासात कोहलीमध्ये खुप बदल झाले.

  • Share this:

लंडन, 25 मे : वर्ल्ड कप सुरु होण्याकरिता आता केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळं सर्व संघ जय्यत तयारी करित आहे. दरम्यान भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळं कर्णधार विराट कोहलीकडून अपेक्षा जास्त वाढल्या आहेत. कारण विराटच्या क्षमतेवर कोणीही संथय घेऊ शकत नाही. क्रिकेटच्या जगात त्यांन आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे, त्याच्या फलंदाजीची तारिफ दिग्गज फलंदाज करतात. मात्र फलंदाज ते कर्णधार या प्रवासात कोहलीमध्ये खुप बदल झाले. दरम्यान कोहली स्वत: ही गोष्ट मान्य करतो, की तो बदलला आहे आणि याचे श्रेय तो आपली पत्नी अनुष्का शर्मा हिला देतो.

बीसीसीआयच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत विराटला तु एवढा जबाबदार कसा झाला असा प्रश्न विचारला असता त्यानं, अनुष्काशी लग्न झाल्यानंतर मी जास्त जबाबदार झालो. तिच्यामुळं मी चांगला कर्णधार आणि खेळाडू बनू शकलो, असे सांगितले. स्पर्धेला सुरुवात होण्याच्या आधी सर्व सहभागी संघांचे कर्णधार एकत्र आले होते.

वर्ल्ड कपसाठी विराटला हवा 'हा' परदेशी खेळाडू!

यावेळी त्यांनी एकमेकांशी संवाद साधला. कर्णधारांच्या संवादावेळी प्रत्येकाला प्रतिस्पर्धी संघातील एक खेळाडू निवडण्यास सांगण्यात आलं होतं. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की कोणा एकाला निवडणं कठीण आहे. एबी निवृत्त झाला आहे त्यामुळे मी फाफ डु प्लेसीला संघात घेईन. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीने इंग्लंडमध्ये गोलंदाज महत्त्वाचे ठरणार आहेत. यासाठी भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला निवडलं. याशिवाय राशिद खान आणि पेंट कमिन्स यांनाही संघात घेण्याची इच्छा असल्याचं फाफ डु प्लेसीने सांगितलं.

असे असतील भारताचे सामने

5 जून : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (दु. 3 वाजता)

9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय (दु. 3 वाजता)

13 जून : भारत विरुद्ध न्युझीलॅंड (दु. 3 वाजता)

16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान (दु. 3 वाजता)

22 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दु. 3 वाजता)

27 जून : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दु. 3 वाजता)

30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (दु. 3 वाजता)

2 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश (दु. 3 वाजता)

6 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (दु. 3 वाजता)

वाचा-हिटमॅनने सांगितलं, 2011 च्या वर्ल्ड कप संघातून त्याला का वगळलं?

वाचा- वर्ल्ड कपसाठी विराटला हवा 'हा' परदेशी खेळाडू!

वाचा- World Cup : विराटचं टेंशन वाढलं, सामन्याआधीच महत्त्वाचा खेळाडू जखमी

वाचा- World Cup : ‘या’ खेळाडूमुळं वर्ल्ड कपआधी पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर

माजी आमदाराच्या कार्यक्रमात पैशांचा पाऊस, VIDEO व्हायरल

First published: May 25, 2019, 10:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading