World Cup : अजूनही धोनीच्याच इशाऱ्यावर चालते टीम इंडिया, विराटनं केला सामन्यानंतर खुलासा

World Cup : अजूनही धोनीच्याच इशाऱ्यावर चालते टीम इंडिया, विराटनं केला सामन्यानंतर खुलासा

धोनीनं वेस्ट इंडिजविरोधात 61 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार लगावत नाबाद 56 धावा केल्या.

  • Share this:

मॅंचेस्टर, 28 जून : ICC Cricket World Cup 2019 भारतीय संघानं सलग पाचवा विजय नोंदवत सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मॅेचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात विराट सेनेनं वेस्ट इंडिजसमोर 269 धावांचे आव्हान ठेवले होते, यात कर्णधार विराट कोहलीनं 72 धावांची खेळी केली तर, महेंद्रसिंग धोनीनं शेवटच्या दोन षटकात आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. शमीच्या 4 विकेट, बुमराह आणि चहलच्या 2 विकेट याच्या जोरावर भारतानं वेस्ट इंडिजला 143 धावांतच गुंडाळले. सामनावीराचा पुरस्कार विराट कोहलीला मिळाला असला तरी, त्यानं विजयाचे श्रेय दिले महेंद्रसिंग धोनीला. या सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीनं धोनीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.

वेस्ट इंडिजवर 125 धावांनी विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीनं धोनी हा भारतीय संघाचा सर्वात मोठा फिनीशर असल्याचे मत व्यक्त केले आहे. सामन्यानंतर विराट कोहलीनं, "धोनीच्या अनुभवाचा आम्हाला नेहमीच फायदा होतो. जेव्हा धोनी खेळत नाही तेव्हा त्याच्यावर टीका करतात पण आम्ही सर्व त्याच्यासोबत आहोत. धोनीनं भारतीय संघाला असंख्य सामने जिंकवले आहेत", असे मत व्यक्त करत टिकाकारांना सडेतोड उत्तर दिले.

धोनीच्या अनुभवाचा टीमला फायदाच

विराट कोहलीनं सामन्यानंतर धोनीच्या अनुभवामुळं टीम इंडियाला फायदा होत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, "सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा तुम्हाला 15-20 धावांची गरज असते, तेव्हा धोनी आपल्या आक्रमक फलंदाजीनं ते करतात. धोनीला कधी आक्रमक फलंदाजी करायची आणि कधी नाही हे माहित आहे. त्यामुळं आम्ही निश्चिंत असतो", असेही सांगितले

धोनीच्या इशाऱ्यावर धावा करते टीम इंडिया

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे. "धोनी आम्हाला संदेश पाठवतो की मैदान कसे आहे, स्कोअर किती असेल. जर धोनीनं सांगितले की 265 धावा होतील असे सांगितले तर आम्ही 300 धावा करण्याच्या भागनडीत पडत नाही", असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं व्यक्त केले.

धोनीची अर्धशतकी खेळी

धोनीनं वेस्ट इंडिजविरोधात 61 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार लगावत नाबाद 56 धावा केल्या. आघाडीचे फलंदाज चांगली फलंदाजी करू शकले नाही, त्यानंतर धोनीनं हार्दिक पांड्यासमवेत चांगली फलंदाजी केली. धोनी आणि पांड्या यांनी सहाव्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी केली. धोनीनं 59 चेंडूत आपले 72वे अर्धशतक लगावले. धोनी भारतासाठी सर्वात जास्त अर्धशतक लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली

वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

First published: June 28, 2019, 9:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading