World Cup : धोनी घेणार निवृत्ती? विराटनं दिलं 'हे' उत्तर

World Cup : धोनी घेणार निवृत्ती? विराटनं दिलं 'हे' उत्तर

ICC Cricket World Cup 2019 : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हा अखेरचा वर्ल्ड कप होता. यानंतर तो निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मँचेस्टर, 10 जुलै : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी त्याचा अखेरचा वर्ल्ड कप खेळत होता. भारताचे आव्हान सेमीफायनलमध्ये संपुष्टात आल्यानंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आता तो एकदिवसीय क्रिकेटलासुद्धा बायबाय करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताचा कर्णधार विराट कोहलीला यावर प्रश्न विचारण्यात आला. त्याला विचारलं की, वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी जाणार का? त्याने निवृत्तीबद्दल काही सांगितलं आहे का?

धोनीच्या निवृत्तीबद्दलच्या प्रश्नावर विराट म्हणाला की, धोनीनं त्याच्या भविष्याबाबत आम्हाला काही सांगितलेलं नाही. त्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास त्यानं नकार दिला. विराटनं या प्रश्नावर साधलेलं मौन धोनीच्या निवृत्तीचे संकेत देणारं तर नाही ना असंही बोललं जात आहे. धोनीनं याआधी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. त्याशिवाय संघाचे कर्णधारपदही त्यानं अचानक

सेमीफायलनमध्ये धोनी उशिरा फलंदाजीला उतरला त्यावरूनही उलट सुलट चर्चा सुरू आहे. तर धोनीने पुन्हा संथ खेळी केली असंही म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, वर्ल्ड कपमधील अखेरचा सामना धोनीच्या एकदिवसीय कारकिर्दीतला अखेरचा सामना ठरू शकतो. मात्र, त्यानंतर धोनीने ही बाब फेटाळून लावत मलाच माहिती नाही कधी निवृत्ती घेईन असं सांगितलं होतं.

वाचा- INDvsNZ : विल्यम्सनने 11 वर्षापूर्वीच्या पराभवाचा घेतला बदला!

वाचा- World Cup : 20 हजार 645 धावा करणारे फलंदाज झाले केवळ 3 धावांवर बाद

वाचा- World Cup जिंकण्याचं भारताचं स्वप्न 'या' कारणांनी भंगलं!

कोब्रा आणि बेडकामध्ये जगण्यासाठी लढाई, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 10:09 PM IST

ताज्या बातम्या