World Cup : क्रिकेटवेड्या आजींची सगळीकडे चर्चा, रोहित-विराटही झाले जबरा फॅन

World Cup : क्रिकेटवेड्या आजींची सगळीकडे चर्चा, रोहित-विराटही झाले जबरा फॅन

87 वर्षांच्या या आजीबाई भारत-बांगलादेश सामन्यांच्या मुख्य आकर्षण ठरल्या होत्या.

  • Share this:

बर्मिंगहम, 03 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतानं बांगलादेशला नमवून थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतानं 315 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशला केवळ 286 धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयासह भारताने सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं आहे तर बांगलादेशच्या आशा संपुष्टात आल्या.

मात्र या सामन्यात भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी फक्त तरूणच नाही तर आबालवृद्धांनी गर्दी केली आहे. त्यामुळं वर्ल्ड कप इंग्लंडमध्य़े आहे की भारतात असा प्रश्न पडू लागला होता. पण या सगळ्यात सर्वांचे लक्ष वेधले ते पिपाणीवाल्या आजींनी. या आजीबाई केवळ सामन्याचा आनंदच घेत नव्हत्या तर भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकार मारल्यावर लहान मुलांसारख्या चक्क पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करत होत्या. त्यांचा उत्साह बघून समालोचन करणाऱ्या सौरभ गांगुली व हर्षा भोगले यांनादेखील या आजीबाईंची दखल घेतली. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ क्षणार्धात सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

दरम्यान सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि सामनावीर रोहित शर्मा यांनी या आजींची भेट घेतली. या आजींची उर्जा पाहून सर्वच अचंबित झाले होते. चारूलता पटेल असे या आजींचे नाव असून त्या 87 वर्षांच्या आहेत. त्या चक्का व्हीलचेअरवरून सामना पाहण्यासाठी आल्या होत्या, त्यामुळं त्या या सामन्याच्या विशेष आकर्षण ठरल्या. एवढंच नाही तर विराटनं स्वत: त्यांच्या सोबत फोटो काढले. सामन्यानंतर चारूलता यांनी, "मी आफ्रिकेत असल्यापासून क्रिकेट पाहते. याआधी टिव्हीवर क्रिकेट पाहायचे, मात्र आता निवृत्तीनंतर मी लाईव्ह क्रिकेट पाहायला सुरुवात केली", असे मत व्यक्त केले.

बांगलादेशविरुद्ध भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 180 धावांची खेळी केली. रोहित शर्माने 104 तर केएल राहुलनं 77 धावांची खेळी करून भारताला भक्कम सुरूवात करून दिली. मात्र, त्यानंतरही भारताचा डाव गडगडला. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने अर्धशतकी खेळी केली. शाकिबला बाद करून पांड्याने मोठं यश मिळवून दिलं. शाकिबने 74 चेंडू 66 धावा केल्या. त्याच्याशिवाय सौम्या सरकार, शब्बीर रहमान आणि मोहम्मद सैफुद्दीन यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत धावगती नियंत्रणात आणली. बुमराहने 4 तर पांड्याने 3 विकेट घेतल्या. चहल, भुवी आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली आणि भारताला सेमीफायनलचे तिकीट मिळवून दिले.

वाचा- World Cup : पंचांशी हुज्जत, विराटवर होऊ शकते सामनाबंदीची कारवाई!

वाचा- World Cup Point Table : भारताची सेमीफायनलला धडक, तीन संघांमध्ये चुरस!

वाचा- World Cup : हिटमॅनला जीवदान मिळालं की शतक होणार हे नक्की!

भिंतीत लपून बसलेल्या अजगराच्या सुटकेचा थरार, पाहा VIDEO

First published: July 3, 2019, 9:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading