World Cup : मोठी बातमी, वेस्ट इंडिज विरोधात विराट आणि बुमराह खेळणार नाही

World Cup : मोठी बातमी, वेस्ट इंडिज विरोधात विराट आणि बुमराह खेळणार नाही

वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी भारतीय संघ वेस्ट इंडिज विरोधात भिडणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे सेमीफायनलचे तिकीट फिक्स होणार आहे.

  • Share this:

लंडन, 25 जून : ICC Cricket World Cupमध्ये सध्या भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सहापैकी एकही सामना त्यांनी गमावलेला नाही. त्यामुळं विराटसेनेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे सेमीफायनलचे तिकीट फिक्स झाले आहे. भारताचा पुढील सामना वेस्ट इंडिज विरोधात गुरुवारी होणार आहे. आता भारताचे केवळ 4 सामने उरले आहेत. यातील वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंड यांच्या विरोधात सामने होणार आहे. मात्र वर्ल्ड कपनंतर वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या मालिकेत विराट कोहली आणि बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे.

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ICC Cricket World Cup स्पर्धेनंतर भारतीय संघ दोन कसोटी, तीन एक दिवसीय आणि तीन टी20 सामने खेळणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येणार असल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

कसोटीमध्ये विराट आणि बुमराह खेळतील मात्र, मर्यादित षटकांच्या मालिकेत त्यांना विश्रांती दिली जाईल. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्यापासून दोघेही सातत्याने खेळत आहेत. त्यांच्यावरील तणावामुळे संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपनंतर किमान महिनाभर खेळाडूंना विश्रांती मिळेल. भारताचा दौऱा सुरू होण्याआधी मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी हे भारत ए संघासोबत जातील.

म्हणून विराट आणि बुमराहला विश्रांती

भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर न्यूझीलंड, आयपीएल आणि आता वर्ल्ड कप स्पर्धा खेळत आहे. सततच्या खेळामुळे खेळाडूंना विश्रांती मिळू शकलेली नाही. त्यांच्यावर पडत असलेल्या ताणाचा खेळावर परिणाम होऊ नये यासाठी आगामी स्पर्धेतील मर्यादित षटकाच्या सामन्यात काही खेळाडूंना विश्रांती दिली जाईल. वर्ल्ड कपमध्ये भारताची कामगिरी पाहता ते फायनलला पोहचतील अशी आशा आहे. त्यामुळे 14 जुलैपर्यंत ते खेळत राहतील. म्हणूनच पुढच्या दौऱ्यासाठी त्यांना विश्रांतीची गरज असेल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

वाचा- World Cup Point Table : बांगलादेश ठरणार जायंट किलर, भारतालाही धोका

वाचा- World Cup: 'भारताकडून पराभव झाल्यानंतर आत्महत्या करावी वाटली'

वाचा-अर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण

बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 25, 2019, 10:37 AM IST

ताज्या बातम्या