World Cup : विराट-धवन आणि जडेजासह भारतीय खेळाडू झाले भावनिक, चाहत्यांचे मानले आभार!

World Cup : विराट-धवन आणि जडेजासह भारतीय खेळाडू झाले भावनिक, चाहत्यांचे मानले आभार!

ICC Cricket World Cup मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सोशल मिडियावरून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

  • Share this:

मँचेस्टर, 11 जुलै : ICC Cricket World Cup तिसऱ्यांदा जग्गजेते होण्याचं भारताचं स्वप्न सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभवाने उद्ध्वस्त झालं. न्य़ूझीलंडने भारताला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. भारताच्या पराभवानंतर संघासह देशवासीय निराश झाले आहेत. पराभवानंतर खेळाडूंनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, जडेजा, कुलदीप यादव, हार्दीक पांड्या यांनी ट्विट केलं आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं म्हटलं की, सर्व चाहत्यांचं आभार, तुम्ही सर्वांनी ही स्पर्धा आठवणीत राहिल अशी केलीत. तुमचं प्रेम आम्हाला जाणवलं. आम्हीसुद्धा निराश आहोत तुमच्या जशा भावना आहेत. जय हिंद

सेमीफायनलमध्ये भारताची अवस्था 6 बाद 92 अशी झाली होती. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि धोनीने शतकी भागिदारी करून विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. जडेजाने अष्टपैलू कामगिरी करत 77 धावांची खेळी केली. जडेजानं म्हटलं की, खेळानं पराभवानंतरही उभा राहणं आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानणं शिकवलं आहे. खरंतर चाहत्यांच आभार माननं पुरेसं ठरणार नाही. चाहत्यांचा पाठिंबाच माझी प्रेरणा आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं संघ सहकाऱ्यांचं, प्रशिक्षकांचं आणि सर्व चाहत्यांचं आभार मानलं. आमच्यापरीने आम्ही सर्वोत्तम प्रयत्न केले असं म्हटलं आहे.

दुखापतीने स्पर्धेला मुकलेला भारताचा सलामीवीर शिखर धवननेसुद्धा ट्विट करून संघाने चांगला खेळ केला असं म्हटलं आहे. तसेच न्यूझीलंडच्या संघाला फायनलमध्ये पोहचल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

फिरकीपटू युझवेंद्र चहलनं ट्वीट करत म्हटलं की, आमचं फक्त एकच ध्येय होतं ते म्हणजे जग्गजेते होणं पण त्यात यश आलं नाही. त्या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. प्रत्येकक्षणी सोबत असलेल्या चाहत्यांचे मनापासून आभार.

गोलंदाज कुलदीप यादवनेसुद्धा चाहत्याचे आभार मानले.

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने वर्ल्ड कपमधील आठवणी आयुष्यभर लक्षात राहतील असं म्हटलं आहे. माझा पहिला वर्ल्ड कप होता पण शेवट निराशाजनक होता. यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असं पांड्याने म्हटलं आहे.

केएल राहुलने भारताचं स्वप्न भंगल्याचं दु:ख झालं असं म्हटलं आहे. तसेच चाहत्यांनी दिलेला पाठिंबा आणि प्रेम याबद्दलही आभार मानलं आहे.

ऋषभ पंतने माझा देश, माझा संघ माझा अभिमान म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

VIDEO : धोनीचा फोटो काढताना फोटोग्राफरलाही रडू कोसळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 07:03 PM IST

ताज्या बातम्या