World Cup : भारत 1563 दिवसांनी दक्षिण आफ्रिकेविरोधात भिडणार, विराटच्या शतकाकडे सर्वांचे लक्ष

World Cup : भारत 1563 दिवसांनी दक्षिण आफ्रिकेविरोधात भिडणार, विराटच्या शतकाकडे सर्वांचे लक्ष

विराटची बॅट ठरणार भारतीय संघासाठी लकी.

  • Share this:

साऊदमप्टन, 05 मे : वर्ल्ड कप सुरु होऊन एक आठवडा झाला असला तरी, भारत आज आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळं या सामन्यात सगळ्यात जास्त नजरा आहेत, त्या विराट कोहलीवर. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळणार आहे. खास गोष्ट म्हणजे विराट आपल्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करतो, त्यामुळं या सामन्यात विराटची बॅट तळपणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शतक तर पक्के

विराट कोहलीचा हा तिसरा वर्ल्ड कप आहे. खास गोष्ट म्हणजे पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. 2011मध्ये विराटनं पदार्पणच आपले पहिले शतक ठोकले. बांगलादेश विरोधात त्यानं नाबाद खेळी केली होती. त्यानंतर 2015च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरोधात विराटनं 107 धावांची खेळी केली होती. त्यामुळं आज दक्षिण आफ्रिकेविरोधात विराट शतकी खेळी करेल का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

विराटचं शतक म्हणजे भारत जिंकणारच

दक्षिण आफ्रिकेविरोधात विराट कोहलीनं आतापर्यंत चार शतक लगावले आहे. ते चारही सामने भारतानं जिंकले आहे. त्यामुळं जर या सामन्यातही विराटनं शतकी खेळी केली तर, दक्षिण आफ्रिकेविरोधात भारत सामना जिंकलेच. विराट कोहलीचा दक्षिण आफ्रिका विरोधात चांगला रेकॉर्ड आहे. त्यांच्याविरोधात विराट फलंदाजी करणे जास्त सोयीचे मानतो. दक्षिण आफ्रिकेविरोधात विराटनं 66.78च्या सरासरीनं 1269 धावा केल्या आहेत. त्यामुळं बुधवारी होणाऱ्या सामन्यात विराटची बॅट चालली तर, त्याचा फायदा भारताला होणार आहे. दरम्यान आकडे पाहिल्यास भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एकहाती भारताला सामना जिंकवून देऊ शकतो. त्यामुळं विराट कोहलीच्या खेळाकडे सगळ्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

वाचा- World Cup : विराटचा मास्टरप्लॅन आला समोर, 'या' 11 खेळाडूंना मिळणार दक्षिण आफ्रिकेविरोधात संधी

वाचा- भारताच्या 'मिशन वर्ल्ड कप'ला आजपासून सुरुवात, पाकिस्तानविरुद्धचा सामना कधी?

वाचा- World Cup : विराटचं जिंकून देणार भारताला वर्ल्ड कप, 'हे' आकडे पाहून तुमचाही विश्वास बसेल

VIDEO: टीम इंडियाच्या विजयासाठी चाहत्यांचं होमहवन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 01:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading