World Cup : विराटच्या फिटनेसला थेट पंचांनी केलं चॅलेंज, भर मैदानात मारले पुश-अप्स

World Cup : विराटच्या फिटनेसला थेट पंचांनी केलं चॅलेंज, भर मैदानात मारले पुश-अप्स

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीली पंचांनी दिलं चॅलेंज.

  • Share this:

लंडन, 19 जून : ICC Cricket World Cupमध्ये सध्या सर्व संघ सेमीफायनमध्ये पोहचण्यासाठी लढत आहेत. इंग्लंडच्या संघानं अफगाणिस्तानला नमवत, जवळजवळ सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्वित केली आहे. यात भारतीय संघही मागे नाही. सध्या भारत 7 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

एकीकडे विराटसेनेनं आपली विजयी घौडदौड सुरु केली आहे. त्यात कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेसची चर्चा सगळीकडे होत आहे. वर्ल्ड कपमध्ये सध्या विराटच्या फिटनेसची चर्चा आहे. कोहलीनं क्रिकेटच्या इतिहासातील जवळ जवळ सर्व रेकॉर्डना गवसणी घातली आहे. त्यात महत्त्वपूर्ण भुमिका बजावली आहे, ती त्याच्या फिटनेसने. मात्र विराटच्या फिटनेसला आता थेट पंचांनी चॅलेंज केले आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात सीमारेषेच्या बाहेर बसलेले राखीव पंच ब्रूस ऑक्सनफर्ड यांनी पुश-अप्स मारण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कृत्या मागचे नक्की कारण कळू शकले नसले तरी, आपला कंटाळा घालवण्यासाठी त्यांनी असे केले असल्याची चर्चा काही काळ रंगली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळं पंच आणि विराट यांच्या व्यायामाची चर्चा रंगत आहे.


विराट कोहलीही सामन्यानंतर आणि सामन्याआधी आपला वेळ जिममध्ये घालवतो, त्यामुळं फिटनेस प्रिय असलेल्या विराटला पंचांनी दिलेलं हे चॅलेंज तो स्विकारणार का, हे काही दिवसात कळेलच.
 

View this post on Instagram
 

Eyes on the ball! #CWC19 #trainingday


A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on
 

View this post on Instagram
 

Train hard, go the extra mile and believe in yourself. ✌🏻


A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विराट हा सध्या सर्वात जास्त तंदुरुस्त खेळाडू मानला जातो. त्यामुळं तो मैदानातही तेजीत दिसतो.

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा- World Cup : गर्लफ्रेंडच्या ट्रॅपमध्ये अडकला होता हा खेळाडू, केली विक्रमी खेळी!

वाचा- बुमराहने शेअर केला 'हा' फोटो, चाहत्यांनी विचारलं अनुपमा आहे का?

SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 10:48 AM IST

ताज्या बातम्या