VIDEO : धोनीच्या 'या' शिलेदाराच्या एका नो बॉलमुळं विजय शंकरची वर्ल्डकप संघात एण्ट्री, काय आहे किस्सा

फ्लॉप खेळी केल्यामुळं त्याला संघातून वगळण्यातही येणार होते. त्याचे करिअर संपणार तेव्हाच, मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याला शेवटची संधी मिळाली.

News18 Lokmat | Updated On: May 27, 2019 07:25 PM IST

VIDEO : धोनीच्या 'या' शिलेदाराच्या एका नो बॉलमुळं विजय शंकरची वर्ल्डकप संघात एण्ट्री, काय आहे किस्सा

मुंबई, 27 मे : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप करिता आता केवळ 3 दिवसांचा कालावधी उरला आहे. दरम्यान विराटला अजूनही चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज मिळालेला नाही. एकीकडे भारतीय संघानं चौथ्या क्रमांकासाठी तमिळनाडूचा ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकर याला संघात संधी दिली आहे. त्याच्या या निवडीबाबत अनेक वादही झाले. कारण त्यानं केवळ 9 एकदिवसीय सामने खेळले आहेत. दरम्यान विजय शंकरनं विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होण्याआधी गौरव कपूर याच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन कार्यक्रमात आला होता. त्यावेळी विजयनं आपल्याला विश्वचषक संघात कशी एण्ट्री घेतली याचे गुपित सांगितले.

विजय शंकर तमिळनाडूकडून रणजी चषक खेळतो. दरम्यान सुरुवातील त्याला रणजी सामन्यातही चांगले यश मिळत नव्हते. सलग सर्व सामन्यात फ्लॉप खेळी केल्यामुळं त्याला संघातून वगळण्यातही येणार होते. त्याचे करिअर संपणार तेव्हाच, मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याला शेवटची संधी मिळाली. मात्र त्या सामन्यातही शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर तो केवळ 5 धावा करत बाद झाला. मात्र शार्दुल ठाकूरचा तो चेंडू नो बॉल होता. मैदानात सोडून गेलेल्या विजयला पुन्हा पंचांनी मैदानात बोलावले.


विजयनं केले त्या संधीचं सोनं

नो बॉलवर बाद झाल्यानंतर विजय शंकर दणक्यात मैदानात आला. तो नो बॉल त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. मुंबई विरुद्धच्या त्याच सामन्यात विजयनं 95 धावांची खेळी केली. त्यानंतर लगेचच त्याची भारत 'अ' संघात निवड करण्यात आली. त्यानंतर थेट त्याची वर्णी लागली ती भारतीय संघात आणि आता विश्वचषकात.

Loading...

कोण आहे विजय शंकर

विजय शंकर हा तमिळनाडूचा खेळाडू असून रणजी सामन्यात त्यानं स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. विजय शंकर सगळ्या प्रथम श्रेणीतील सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज होता. त्याच्या या खेळीमुळेच विजयची वर्णी विश्वचषक संघात झाली असावी. त्याने केवळ 9 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर तेवढेच टी-20 सामने खेळले आहेत. त्यामुळं चौथ्या क्रमांकाकरिता विजय शंकरची वर्णी लगली असली तरी, त्याच्या निवडीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

वाचा-World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

वाचा-भेलपुरीवाल्याकडून आईला समजला मुलाचा सहा षटकारांचा पराक्रम

वाचा-World Cup : 'भगव्या रंगाची जर्सी, हा तर भाजप लाटेचा परिणाम'

वाचा-World Cup : पाकिस्तानचा कर्णधार विराटसेनेला घाबरला, सामन्याआधीच पराभवाची भीती


उमेदवारी मागे घेण्यासाठी राजू शेट्टींचा प्रकाश आंबेडकरांना 24 वेळा फोन?, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2019 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...