World Cup : पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी, 'हा' खेळाडू आता संघाबाहेर जाणार?

World Cup : पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी, 'हा' खेळाडू आता संघाबाहेर जाणार?

ICC Cricket World Cup : जहीर खानलाही न जमलेला रेकॉर्ड करणारा खेळाडू आता संघाबाहेर जाणार?

  • Share this:

लंडन, 29 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारताचा रविवारी इंग्लंडविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारत सेमीफायनलचं तिकीट पक्कं करण्यासाठी उत्सुक असेल. तर इंग्लंडला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजय गरजेचा आहे. भारतानं आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. तरीही भारतासमोर मधल्या फळीतील फलंदाजीचा प्रश्न आहे. आघाडीच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही तर धावा कमी होतात. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज रोहित शर्मा, विराट आणि राहुल मोठी खेळी करतात तेव्हा मोठं आव्हान उभा करता येतं. तर जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांच्या माऱ्यासमोर धावा करणं प्रतिस्पर्धी संघाला कठीण होतं. गेल्या दोन वर्षांत भारताने मिळवलेल्या विजयात हेच मोठं कारण आहे. दरम्यान भारतासमोर मधल्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. अनेकदा मोक्याच्या क्षणी मधली फळी ढेपाळलेली दिसली आहे.

वेस्ट इंडिज विरोधातही भारताची आघाडीची फळी फेल ठरली आणि त्यानंतर मधल्या फळीत विजय शंकर आणि केदार जाधव धावा करण्यात अपयशी ठरले. सलामीवीर रोहित शर्मा 18 धावांवर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागिदारी केली. मात्र 48 धावावंर राहुल बाद झाला. त्यांनतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या विजय शंकरला या सामन्यातही चांगली फलंदाजी करता आली नाही. शंकर 14 धावा करत बाद झाला. तर,केदार जाधवनं केवळ 7 धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि धोनी यांनी भारताचा डाव सावरला. या दोन्ही खेळाडूंनी सहाव्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी केली आणि भारतानं वेस्ट इंडिजपूढे 269 धावांचे आव्हान ठेवले.

चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम

वर्ल्ड कपमध्ये 5 सामन्यात भारताने चार नंबरवर तीन फलंदाज खेळवले. यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. पांड्या नेहमी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो पण सामन्यातील परिस्थिती पाहून त्याला बढती दिली गेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला संधी देण्यात आली होती. चौथ्या क्रमांकासाठी तोच योग्य पर्याय होता. मात्र, शिखर धवन स्पर्धेला मुकल्यानं त्याला सलामीला उतरावं लागत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध विजय शंकर चौथ्या क्रमांकावर उतरला. त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. तसेच रोहित आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर धावगतीचा वेगही मंदावतो. भारतासमोर सध्यातरी मधल्या फळीतील फलंदाजी डोकेदुखी ठरत आहे.

Loading...

विजय शंकर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून पदार्पण करणाऱ्या विजय शंकरला वर्ल्ड कपमध्ये फक्त एकदा चौथ्या क्रमांकावर फंलदाजी करण्याची संधी मिळाली आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध फक्त 29 धावा केल्या. शंकर गोलंदाजीसुद्धा करू शकतो. त्याने पाकिस्तानविरुद्ध मिळालेल्या संधीचं सोनं केलं. भुवनेश्वर कुमारचे अर्धवट षटक पूर्ण करताना त्याने वर्ल्ड कपमधील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. भारताकडून अशी कामगिरी कोणत्याच गोलंदाजाला करता आलेली नाही. पाकविरुद्धच्या सामन्यात दोन गडी बाद करून शंकरने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मात्र, त्यानंतर त्याला गोलंदाजी दिली नाही. फलंदाजीत त्याने निराशा केल्यानं सध्या त्याच्या जागी रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिकला संघात घ्यावं अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे.

दिनेश कार्तिक

भारताकडे चौथ्या क्रमांकासाठी दावेदारांची कमी नाही. राखीव यष्टीरक्षक म्हणून संघात असलेल्या दिनेश कार्तिकने आतापर्यंत 77 डावात फलंदाजी केली असून यात सर्वाधिक चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकलं नाही. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 38.72 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कार्तिकच्या अनुभवाचा फायदा भारताला होऊ शकतो.

ऋषभ पंतला संघात स्थान हवे

वर्ल्ड कपमध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विजय शंकरनं चांगली फलंदाजी केली नाही आहे. त्यामुळं शंकरच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यास हरकत नाही. तसेच, विजय शंकरनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 सामन्यात 223 धावा केल्या आहेत. त्यामुळं चाहत्यांनी ऋषभ पंतला संघात स्थान द्यावे अशी मागणी केली आहे.

सेमीफायनलसाठी भारताला एका विजयाची गरज

भारतीय संघानं वर्ल्ड कपमध्ये 6 सामने खेळले आहेत. त्यातील 5 सामने जिंकत भारतीय संघ गुणतालिकेत 11 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला अंतिम 4 संघात पोहचण्यासाठी एक सामना जिंकावा लागणार आहे.

पाहा 'मेन इन ब्ल्यू' कसे दिसतात भगव्या रंगात, PHOTO VIRAL

World Cup Point Table : लंकेच्या पराभवाने तीन संघांमध्ये चुरस!

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...