World Cup : सचिन की धोनी कोण श्रेष्ठ, चाहत्यांमध्ये ट्विटर वॉर !

World Cup : सचिन की धोनी कोण श्रेष्ठ, चाहत्यांमध्ये ट्विटर वॉर !

अफगाणिस्तान विरोधात धोनीनं केलेल्या धिम्या फलंदाजीमुळं सचिननं त्यावर टिका केली होती. त्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी सचिनला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

  • Share this:

लंडन, 25 जून : ICC Cricket World Cupमध्ये सध्या भारतीय संघ अपराजित संघ राहिला आहे. भारतानं 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे तर एक सामना पावसामुळं रद्द झाला. मात्र अफगाणिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात भारतानं अतिशय धिम्या गतीनं फलंदाजी केली. त्यामुळं भारतासमोर मधल्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. अनेकदा मोक्याच्या क्षणी मधली फळी ढेपाळलेली दिसली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज धोनीचा फॉर्म पूर्वीसारखा राहिला नाही.

अफगाणिस्तानविरुद्द भारताची आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. भारताच्या चार बाद 135 धावा झाल्या होत्या. त्यावेळी 20 ओव्हर बाकी होत्या. त्यानंतर भारताला फक्त 89 धावा करता आल्या. यामध्ये धोनी सर्वात जास्त वेळ मैदानात होता. यात वेगाने धावा न होण्यामागे केदार जाधव आणि धोनी यांची संथ खेळी होती. धोनी फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर धावांसाठी धडपडताना दिसत होता. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर त्याने 52 चेंडूत फक्त 28 धावा केल्या. भारताच्या 3 बाद 122 धावा असताना धोनी मैदानात आला होता. त्यानंतर कोहली 31 व्या षटकात बाद झाला. धोनीने पहिल्या 26 चेंडूत एकही चौकार मारला नाही. तसेच वेगवान गोलंदाजाच्या 9 चेंडूत त्याने 16 धावा केल्या. त्याने वेगवान गोलंदाजांनाच तीन चौकार मारले. तर फिरकीपटूंच्या 43 चेंडूत त्याने फक्त 12 धावा केल्या. यात धोनीने जवळपास 30 चेंडू निर्धाव खेळले. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीला स्ट्राइक बदलता आला नाही. खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर त्याला फटकेबाजी करता आली नाही.

सचिननं केली होती धोनीवर टिका

धोनीच्या अफगाणिस्तान विरोधातल्या धिम्या खेळीवर सचिननं टिका केली. त्यानं, "धोनीसारख्या वरिष्ठ खेळाडूने त्यावेळी नेतृत्व करायला हवे होते. जाधवच्या वाट्याला या मालिकेत जास्त वेळा फलंदाजी करण्याची संधी आली नाही. त्यामुळे धोनीने फटकेबाजीसाठी पुढाकार घ्यायला हवा होता", असे मत व्यक्त केले होते.

त्यांनी धोनीला चांगल्या सरासरीने फटकेबाजी करता आली नाही,असे म्हणत फटकावले. मात्र, सचिनच्या या टीकेनंतर धोनी चाहत्यांनी सचिनलाच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. धोनीच्या चाहत्याने, "धोनी हा श्रेष्ठ फलंदाज असून सचिन सारखा तो स्वत:साठी कधीच खेळला नाही अशी टीका केली.

तर, काही चाहत्यांनी धोनी की सचिन कोणाचे फॅन्स जास्त असा सवाल उपस्थित केला.

काही चाहत्यांनी सचिन आणि धोनी दोघांच्या चाहत्यांना फैलावर घेतले. दोन्ही खेळाडू देशासाठी खेळले आहेत, त्यामुळं त्यांच्यात तुलना करू नका असे एक क्रिकेट चाहत्याने ट्विट केले.

तर, एका चाहत्यानं 2011च्या वर्ल्ड कपमधला सचिन आणि धोनीचा फोटो शेअर केला.

दरम्यान अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकात मोहम्मद शामीने घेतलेल्या हॅटट्रीकमुळे भारताने हा सामना जिंकला. मात्र श्रीलंका, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरोधात सामने जिंकण्यासाठी भारताला मधल्या फळीतील फलंदाजी चांगली करावी लागणार आहे.

वाचा- World Cup Point Table : बांगलादेश ठरणार जायंट किलर, भारतालाही धोका

वाचा- World Cup: 'भारताकडून पराभव झाल्यानंतर आत्महत्या करावी वाटली'

वाचा-अर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण

बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 25, 2019, 9:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading