World Cup : 'भगव्या रंगाची जर्सी, हा तर भाजप लाटेचा परिणाम'

World Cup : 'भगव्या रंगाची जर्सी, हा तर भाजप लाटेचा परिणाम'

आयसीसीच्या नवीन नियमांमुळं भारताला आपली ऐतिहासिक निळ्या रंगाची जर्सी आता भगव्या रंगाची होणार आहे.

  • Share this:

लंडन, 27 मे : इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकाला केवळ 3 दिवस उरले असताना, सर्व संघ जय्यत तयारी करित आहेत. दरम्यान विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ पहिल्यांदाच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. दरम्यान दरवर्षी भारतीय संघाच्या जर्सीत दरवर्षी मोठे बदल केले जातात. मात्र यंदाचा भारताची जर्सी चक्क भगव्या रंगाची करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. याबाबत कोणतेही फोटो किंवा माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली नसली तरी, आयसीसीच्या नवीन नियमांमुळं भारताला आपली ऐतिहासिक निळ्या रंगाची जर्सी आता भगव्या रंगाची होणार आहे.

30 मेपासून विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होत असली तरी, भारताचा पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. मात्र, भारतीय संघ सराव सामन्यांसाठी याआधीच इंग्लंडला पोहचला आहे. दरम्यान सध्या सुरु असलेल्या सराव सामन्यात तरी, भारतीय संघ निळ्या जर्सीमध्येच दिसत आहे. मात्र, भारतीय संघ भगव्या रंगाच्या दुसऱ्या जर्सीतही दिसण्याची शक्यता काही वृत्तसंस्थांनी व्यक्त केली. त्यामुळं भारतीय संघाकडे भगव्या रंगाची एक वेगळी किट आहेत. न्यु इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीनं एकाच रंगाची जर्सी घालणाऱ्या संघांना आपली सामनादरम्यान त्यातील एका संघाला आपली जर्सी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या जर्सीचा रंग समान असल्यामुळं भारतानं भगव्या रंगाची जर्सीही बनवून घेतली आहे.

हे आहे भगव्या रंगाच्या जर्सी मागचे कारण

विश्वचषकात भारत, इंग्लंड, अफगाणिस्ताण, श्रीलंका या संघांची जर्सी निळ्या रंगाची आहे. या संघात सामने होत असताना एकाच रंगाच्या जर्सीमुळं चाहत्यांना आणि समालोचकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळं फुटबॉलमध्ये जो नियम वापरला जातो तो आता आयसीसी क्रिकेटमध्येही वापरला जाणार आहे.आयसीसीनं भारताला दुसऱ्या रंगाच्या जर्सीसाठी रंग निवडण्याची संधी दिली होती. त्यावेळी भगवा रंग निवडण्यात आला. मात्र, बीसीसीआयनं आतापर्यंत दुसरी किट किंवा त्या संदर्भात माहिती दिलेली नाही. याआधी भारत आपल्या परंपरांगत असलेल्या निळ्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरेल. दुसरीकडे बांगलादेश, पाकिस्तान यांच्यातही असेच झाले होते. त्यांच्या जर्सी एकसारख्या असल्यामुळं बांगलादेशला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागला होता. दरम्यान भारत कोणत्या सामन्यात भगव्या रंगाची जर्सी परिधान करेल, याबाबत माहिती मिळालेली नाही.

चाहते म्हणताता, हा आमच्या डोळ्यांवर अन्याय

भारतीय संघ भगव्या जर्सीमध्ये सामना खेळण्यास उतरला तर हा आमच्या डोळ्यांवर अन्याय आहे. कृपया असे करु नका, अश्या भावना ट्विटरवर भारतीय चाहत्यांनी केल्या आहेत.तर, काही चाहत्यांनी हा भाजप लाटेचा परिणाम असल्याचे ट्विट केले आहे.

यंदाच्या जर्सीमध्ये झाले हे नवे बदल

30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात भारतीय संघ पहिल्यांदाच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. दरम्यान, या विश्वचषकात काही बदलाव करण्यात आले आहेत. या जर्सीची कॉलर नारंगी रंगावरुन निळ्या रंगाची करण्यात आली आहे. तसेच या कॉलरवर 1983 चा विश्वचषक विजय, 2007चा टी-20 विश्वचषक विजय आणि 2011 विश्वचषक विजय यांची नोंद करण्यात आली आहे.

असे असतील भारताचे सामने

5 जून : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (दु. 3 वाजता)

9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय (दु. 3 वाजता)

13 जून : भारत विरुद्ध न्युझीलॅंड (दु. 3 वाजता)

16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान (दु. 3 वाजता)

22 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दु. 3 वाजता)

27 जून : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दु. 3 वाजता)

30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (दु. 3 वाजता)

2 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश (दु. 3 वाजता)

6 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (दु. 3 वाजता)


वाचा-World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

वाचा-भेलपुरीवाल्याकडून आईला समजला मुलाचा सहा षटकारांचा पराक्रम

वाचा-वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा लागू होणार ICCचे 7 नियम


उमेदवारी मागे घेण्यासाठी राजू शेट्टींचा प्रकाश आंबेडकरांना 24 वेळा फोन?, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2019 04:42 PM IST

ताज्या बातम्या